देशहितासाठी गरजेइतकेच सोने करा

    दिनांक :12-May-2026
Total Views |
लग्नसराईमुळे सराफा बाजारात सोने खरेदीचा उत्साह कायम
- चांदीच्या दरात उसळी
सोने- समृद्धी, सौभाग्य आणि धार्मिकतेचे प्रतीक
 
नामदेव भदे
नागपूर,
आगामी काळात Gold and Silver Purchase सोने-चांदीची अनावश्यक खरेदी टाळा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर सराफा व्यावसायिकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. लग्नसराईमुळे इतवारीच्या सराफा बाजारात सोने खरेदीचा उत्साह कायम दिसून येत आहे.
 
 
gold-
 
भारतीय संस्कृतीत सोन्याला अत्यंत पवित्र स्थान आहे. सोने केवळ एक मौल्यवान धातू नसून समृद्धी, सौभाग्य आणि धार्मिकतेचे प्रतीक मानले जाते. लग्नसमारंभात सोन्याचे दागिने परिधान करणे सौभाग्य मानले जात असताना पंतप्रधानांचे आवाहन देशहितासाठी आणि परकीय चलन वाचवण्यासाठी असू शकते, अशी प्रतिक्रिया ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी कौन्सिलचे राजेश रोकडे यांनी व्यक्त केली आहे.

दागिने उद्योगावर प्रतिकूल परिणाम
पश्चिम आशियाई संकटाच्या पार्श्वभूमीवर परकीय चलन वाचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक वर्षासाठी सोन्याची खरेदी पुढे ढकलण्याचे केलेले आवाहन रत्न आणि दागिने उद्योगावर प्रतिकूल परिणाम करू शकते, हे मान्य करून इतवारीच्या सराफा व्यावसायिक काही मूलभूत प्रश्न उपस्थित केले आहे.

दरात मोठी उसळी
Gold and Silver Purchase  सोने ही केवळ हौस नाही, तर सुरक्षा असे समजून अनेक ग्राहक सोने खरेदी करतात. आज सोन्याच्या दरात १ हजार ५०० रुपयांची वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात तब्बल १० हजार रुपयांची वाढ झाली आहे. ऐन लग्न सराईच्या काळात सोन्याचे भाव वाढले तरी सुध्दा अनेकजण सराफा बाजारात -चांदीचे दागिणे खरेदी करण्यासाठी गर्दी करीत असल्याचे चित्र आहे. स्थानिक सराफा बाजारात सोमवारी सोने आणि चांदीच्या दरात वाढ नोंदविण्यात आली. सोने प्रति १० ग्रॅम १ लाख ५२ हजार ४०० रुपयांवर पोहोचले. मागील व्यवहार सत्रात सोने प्रति १० ग्रॅम १ लाख ५२ हजार २०० रुपयांवर होते. चांदीच्या दरातही मोठी उसळी आली. चांदी प्रति किलो २ लाख ६७ हजार ४०० रुपयांवर पोहोचली. मागील सत्रात चांदीचा दर प्रति किलो २ लाख ५८ हजार ८०० रुपये होता.
महिला कारागिरांची संख्या सर्वाधिक
ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी कौन्सिलचे अध्यक्ष राजेश रोकडे यांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधानांनी परदेशातून आयात होणार्‍या सोन्याची खरेदी केवळ पुढे ढकलण्याची केली आहे. तसेच देशात बनवलेल्या सोन्याच्या दागिन्यांची खरेदी थांबवण्यास सांगितले नाही. ग्राहक आता जुन्या दागिन्यांचा पुनर्वापर करून नवीन दागिने बनवू शकतात. यासाठी सरकार योजना आणण्याच्या तयारीत आहे. जेम्स अँड ज्वेलरी उद्योगात महिला कारागिरांची संख्या सर्वाधिक आहे.
व्यापक राष्ट्रीय चिंता दर्शवते
सोन्याचा वापर जबाबदारीने करण्याच्या पंतप्रधानांच्या आवाहनामागे व्यापक राष्ट्रीय चिंता मात्र वर्षभर सोने खरेदी न केल्यास हजारो महिलांच्या कारागिरांच्या नोकर्‍या धोक्यात येण्याची शक्यता आहे. देशातील लाखो सुवर्णकार, कारागीर, छोटे व्यावसायिकांचे भविष्य या व्यवसायावर अवलंबून असल्याची माहिती लोंदे ज्वेलर्सचे संचालक राजेश लोंदे यांनी दिली.