७५ लाखाचा १० टन गुटखा पकडला

-२५ लाखाचा ट्रकही जप्त -चांदूर रेल्वे पोलिसांची कारवाई

    दिनांक :12-May-2026
Total Views |
अमरावती, 
gutkha-seized : तब्बल ७५ लाखाच्या वर किंमत असलेला १० टन गुटखा भरलेला ट्रक चांदूर रेल्वे पोलिसांनी पकडून मोठी कारवाई पार पाडल्याने पोलिसांचे जिल्हाभरात कौतुक होत आहे.
 
 
amt
 
 
 
मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, चांदूर रेल्वे येथील पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ पाठलाग करून अवैध गुटखा वाहतूक करणारा ट्रक मालखेड गावाच्या हद्दीत मोठ्या शिताफीने पकडला. या कारवाईदरम्यान ट्रक चालक अमरावतीचा पठाण चौकातील ३६ वर्षीय आरोपी शेख इमरान शेख मुस्कान याला ताब्यात घेण्यात आले. ट्रकमध्ये अवैध गुटखा व सुगंधी तंबाखूचा साठा आढळून आला.
 
 
जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये ७५ लाख ७५ हजार रुपयांचा १० टन गुटखा, २५ लाखाचा वाहतूक करणारा ट्रक आणि ६० हजाराचे दोन मोबाईल, असा एकूण रुपये १ कोटी १ लाख ३५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणातील तीन ते चार आरोपी फरार असून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांचा शोध सुरू आहे. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक वीणा पंडे, उप निरीक्षक रोहित कुदळे, उपनिरीक्षक नितेश आझाडे व अन्य सहकार्‍यांनी केली.