सरकारचा मोठा निर्णय! महाविकास आघाडीने थांबवलेली योजना पुन्हा सुरू

    दिनांक :12-May-2026
Total Views |
मुंबई,
housing-scheme-for-police-personnel : राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांसाठी असलेली गृहनिर्माण योजना महाविकास आघाडी सरकारच्या काळात बंद करण्यात आली होती. मात्र आता ही योजना पुन्हा सुरू करण्यात आली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याला मंजुरी दिली आहे.
 
 
cm
 
 
या योजनेअंतर्गत राज्यातील सुमारे ५,४५९ पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना घर खरेदी किंवा बांधकामासाठी एकूण १,७६८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.
 
सरकारच्या म्हणण्यानुसार, जनतेच्या सुरक्षेसाठी अहोरात्र काम करणाऱ्या पोलिसांना हक्काचे घर मिळावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पूर्वी बंद झालेली व्याजसवलत आणि घरबांधणी योजना आता पुन्हा सुरू करून पोलिसांच्या कल्याणाला गती देण्यात आली आहे.