देशात बालगुन्हेगारीत सातत्याने हाेत आहे वाढ

    दिनांक :12-May-2026
Total Views |
- बिहार अव्वल स्थानावर तर महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर
- पालक वर्गांत चिंतेची बाब

अनिल कांबळे
नागपूर,
गेल्या काही वर्षांपासून देशभरात बालगुन्हेगारीमध्ये सातत्याने हाेत असलेली वाढ पालकवर्गांसाठी चिंताजनक असून बिहार राज्य Juvenile delinquents बालगुन्हेगारीत अव्वल स्थानावर आहे. तर महाराष्ट्र राज्याचा देशात दुसरा क्रमांक असून मध्यप्रदेश तिसऱ्या स्थानावर आहे. बिहारमध्ये 5037 अल्पवयीन मुलांवर गुन्हे दाखल झाले असून महाराष्ट्रात 3779 बालगुन्हेगारांचा समावेश आहे. ही धक्कादायक आकडेवारी एनसीआरबीच्या अहवालातून समाेर आली आहे.
 
balGunhgar
 
देशात अल्पवयीन मुलांमध्ये शिक्षणाचा अभाव, वाढत्या वयात शरीरात हाेणारे बदल, आईवडिलांची व्यसनाधीनता, बेराेजगारी, काैटुंबिक तणाव, साेशल मीडियाचा वाढता प्रभाव, नशा करण्याची लागलेली सवय आणि शिक्षणापासून वंचित राहिल्यामुले अनेक 18 वर्षांखालील मुले गुन्हेगारीच्या गर्तेत अडकले आहेत. ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारीकडे कल असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. शहरात अगदी हाकेच्या अंतरावर गांजा, ड्रग्ज, एमडी, हुक्का पार्लर आणि अंमली पदार्थ मिळत असल्यामुळे त्याकडे शाळकरी मुली आणि लवकर आकर्षित हाेतात. नशेच्या आहारी गेलेल्या मुलांचा बालगुन्हेगारांमध्ये सर्वाधिक टक्का आहे. यासाेबतच चाेरी, घराेडी, वाहन चाेरी, माेबाईल हिसकावणे, मारामारी, दराेडे तसेच गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग वाढताना दिसत आहे. काही प्रकरणांमध्ये साेशल मीडियावरून निर्माण हाेणारी आक्रमक मानसिकता आणि ऑनलाइन गेम्सचा प्रभावही कारणीभूत ठरत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. देशात पहिल्या स्थानावर असलेल्या बिहारमध्ये बालगुन्हेगारांवर 5,037 गुन्हे दाखल असून महाराष्ट्रात 3,779 बालगुन्हेगारीच्या घटना दाखल आहेत. तिसèया स्थानावर मध्यप्रदेश (3,474), चवथ्या स्थानावर तामीलनाडू (2,946) आणि पाचव्या स्थानावर राजस्थानचा (2827) क्रमांक लागताे. देशात एकूण 34887 बालगुन्हेगारीच्या घटनांची नाेंद असून 2023 मध्ये 31665 घटनांची नाेंद हाेती, हे विशेष.
बलात्काराच्या गुन्ह्यांत मध्यप्रदेश अव्वल
Juvenile delinquents  देशभरात लैंगिक अत्याचारासारख्या गंभीर गुन्ह्यातही बालगुन्हेगारांचा माेठ्या प्रमाणात समावेश आहे. प्रेमप्रकरण, एकर्ती प्रेम, अनैतिक संबंध किंवा ब्लॅकमेलिंग करुन लैंगिक अत्याचार करणाèयांमध्ये बालगुन्हेगारांची माेठी संख्या आहे. दारु आणि अंमली पदार्थ सेवन करणाèया मुलांमध्ये आक्रमकता आणि लैंगिक गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याची माहिती आहे. लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात मध्यप्रदेशातील सर्वाधिक (260)बालगुन्हेगारांचा समावेश आहे. महाराष्ट्राचा क्रमांक (155) दुसरा असून तिसèया स्थानावर राजस्थान (153) समावेश आहे.
समूपदेशनातून साेडवायला हवा विळखा
बालगुन्हेगारी राेखण्यासाठी समुपदेशन, शैक्षणिक पुनर्वसन, क्रीडा व काैशल्य विकास कार्यक्रमांवर भर देण्याची आवश्यकता असल्याचे मत काही समूपदेशकांनी वर्तवले आहे. तसेच पालक, शाळा आणि समाज यांनी संयुक्तपणे जबाबदारी घेतल्यासच ही वाढती समस्या नियंत्रणात आणता येईल. अनेकदा बालगुन्हेगार म्हणून शिक्का लागला कि पाेलिस त्याला वारंवार गुन्ह्यात गाेवतात, त्यामुळे ताे माेठा गुन्हेगार हाेण्याची भीती असते.
पालक-मुलांमधील ओलावा घटला
Juvenile delinquents  काेणतीही मुले जन्माने गुन्हेगार नसतात. ताे गुन्हेगारी किंवा गुन्हेगारांच्या संपर्कात आल्याने कळत-नकळत गुन्हेगारीकडे आकर्षित हाेतात. यात काही प्रमाणात पालकांसह समाजही जबाबदार आहे. मुलं आणि पालक यांच्यातील संवाद कमी हाेत चालला आहे. यामुळे मुलांना चांगले आणि वाईट याच्यातील फरक समजत नाही. पालकांना मुलांकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. पालक-मुलांमध्ये संवाद वाढण्याची गरज आहे.
 
- प्रा. राजा आकाश (मानसाेपचारतज्ञ)