ज्योतिबा माध्यमिक विद्यालयात रोबोटिक समर कॅम्प

    दिनांक :12-May-2026
Total Views |
नागपूर,
Jyotiba Vidyalaya लोकमान्य टिळक जनकल्याण शिक्षण संस्थेअंतर्गत ज्योतिबा माध्यमिक विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेज येथे ‘स्टीम शक्ती प्रोग्राम’ अंतर्गत रोबोटिक समर कॅम्पचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

58 
 
 
कॅम्पदरम्यान ट्रेनरखडसे यांनी विद्यार्थ्यांना रोबोटिक्सविषयी मार्गदर्शन करत विविध प्रात्यक्षिके सादर केली. यामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख होऊन नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळाली. Jyotiba Vidyalaya या उपक्रमासाठी प्राचार्य अरुणा कडू, पर्यवेक्षक वांदे तसेच शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.
सौजन्य :जांबुवंत वांदे,संपर्क मित्र