समुद्रपूर,
Maheshwari Girde Honored गिरड येथील शेतकरी कुटुंबातून आलेल्या महेश्वरी गिरडे हिने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले स्थान निर्माण केले आहे. दिल्ली येथे मंगळवार १२ रोजी आयोजित समारंभात महेश्वरी गिरडे हिला राष्ट्रीय युवा नेतृत्त्व २०२६ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या समारंभात श्रीलंकेच्या उच्चायुत महिषिणी कोलोन तसेच ओडिशा शासनाचे सचिव विश्व युवा केंद्राचे मुख्य कार्यपालन अधिकारी संग्राम यांच्या हस्ते महेश्वरीला सन्मानित करण्यात आले आहे. शेतकरी कन्या महेश्वरीने वतृत्व, सूत्रसंचालन, समाजसेवा, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण विकास यामध्ये मोलाचे योगदान दिले आहे. या पुरस्काराबद्दल आ. समीर कुणावार, शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले, सरपंच संघटनेचे जिल्हा प्रसिद्ध प्रमुख विलास नवघरे, गिरड ग्रामपंचायतचे प्रशासक राजू नौकरकर, जिपचे माजी सदस्य फकिरा खडसे, जिपचे माजी सदस्य डॉ. महैश गौर, पंसचे माजी सदस्य शेख इस्त्राईल, माजी उपसरपंच मंगेश गिरडे, माजी सरपंच विजय तडस, गजानन गारघाटे, ग्रापं माजी सदस्य राहुल गाढवे, अमोल पर्बत, प्रशांत ठाकूर, आदींनी अभिनंदन केले.