नागपुरकरांना उन्हाच्या तीव्र चटक्यांचा फटका

    दिनांक :12-May-2026
Total Views |
तापमान पुन्हा उसळले
नागपूरचा पारा ४३.० अंशावर
२ ते ४ अंशाने पारा वाढणार
नागपूर,
Nagpur's Temperature गत एप्रिलमध्ये नागपूर व अकोला शहराचे तापमान सर्वाधिक झाले होते. अवकाळी पावसाचे सावट हटताच नागपूरसह संपूर्ण विदर्भातील पारा वाढला आहे. सोमवारी नागपूरचे तापमान ४२ अंश सेल्सिअस नोंदविले होते. तर मंगळवारी पारा पुन्हा उसळला आणि ४३.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दिवसभर उष्णतेचे चटके सहण करीत असलेल्या नागपूरकरांना पुढील काही दिवस उन्हाचे चटके बसणार आहे.


Nagpur 
 
पारा पुन्हा वाढेल
Nagpur's Temperature दरम्यान हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार नागपूरसह विदर्भात शुक्रवार, १५ पर्यंत २ ते ४ अंशाने पारा वाढीचा अंदाज वर्तवला आहे. तर काही जिल्ह्यांना उष्ण लाटेचाही सामना करावा लागू शकतो. विशेषत: अकोला, अमरावतीत सूर्यप्रकोप अधिक होण्याची शक्यता वर्तविली आहे.
मंगळवारी सर्वाधिक तापमान ४५.६ अंश सेल्सिअस अकोला शहराचे तापमान नोंदविले. तापमान सरासरीच्या आसपास असले तरी आर्द्रतायुक्त उकाड्याने नागपूरकरांचा घाम निघत आहे.