पुसद,
National People's Court जिल्हा व सत्र न्यायालयात शनिवारी झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत 396 प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. आपसी तडजोडीतून तब्बल 3 कोटी 9 लाख 38 हजार 372 रुपयांची वसुली करण्यात आली. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आणि तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष रामगडिया यांच्या अध्यक्षतेत लोकअदालत पार पडली. यात दिवाणी, फौजदारी, कौटुंबिक, मोटार अपघात दावे, बँक प्रकरणे, दाखलपूर्व प्रकरणे, वीज देयके व फायनान्स प्रकरणांचा समावेश होता.
National People's Court लोकअदालतीत 393 दिवाणी व फौजदारी प्रकरणांचा निपटारा करण्यात आला, तर 3 दाखलपूर्व प्रकरणे निकाली काढण्यात आली. एका मोटार अपघात दावा प्रकरणात अर्जदारास नॅशनल इन्शुरन्स कंपनीतर्फे 61 लाख रुपयांची नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली. अर्जदारातर्फे बिडवई यांनी, तर विमा कंपनीतर्फे चिद्दरवार यांनी काम पाहिले. दरम्यान, एका कौटुंबिक प्रकरणात समुपदेशन व मध्यस्थीमुळे उभय पक्षांतील वाद मिटून जोडप्याने पुन्हा एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तुटण्याच्या उंबरठ्यावर असलेला संसार पुन्हा मार्गी लागला. लोकअदालत पॅनेलमध्ये शाह, अत्रे, बिरहारी व यादव यांनी काम पाहिले. विधिज्ञ तनवीर खान, नरवाडे, सगणे व पाठक यांनी पंच म्हणून सहभाग घेतला. या उपक्रमासाठी बँक अधिकारी, कर्मचारी, पोलिस अधिकारी व न्यायालय कर्मचाèयांनी सहकार्य केले.