साहित्यसृष्टीतील नवप्रवाह घडवतील परिवर्तन : अरुणा सबाने

विदर्भ साहित्य संघाद्वारे पुस्तक लोकार्पण व सत्कार सोहळा

    दिनांक :12-May-2026
Total Views |
वर्धा, 
aruna sabane ग्रंथनिर्मितीतील नवोदित प्रतिभावंतांचे योगदान महत्त्वाचे असून या नव्या प्रवाहांमुळे परिवर्तन घडून येईल, अशी आशा प्रसिद्ध साहित्यिक व सामाजिक कार्यकर्त्या अरुणा सबाने यांनी विदर्भ साहित्य संघ, वर्धा शाखेद्वारे आयोजित पुस्तक लोकार्पण समारोहात व्यत केली. स्थानिक निसर्ग सेवा समितीच्या ऑसिजन पार्कमध्ये आयोजित या कार्यक्रमात राहुल राऊत ‘सुगतो’ लिखित अ कप ऑफ टी आणि आर्किटेट निखिल अवथनकर लिखित ए स्केचर्स बुक या पुस्तकांचे लोकार्पण अरुणा सबाने यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कादंबरीकार प्रा. नवनीत देशमुख तर वृक्षमित्र मुरलीधर बेलखोडे, उपविभागीय अभियंता महेश मोकलकर, विदर्भ साहित्य संघाचे शाखाध्यक्ष संजय इंगळे तिगावकर, सहसचिव प्रा. पद्माकर बाविस्कर, लेखकद्वय राहुल राऊत, निखिल अवथनकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
 

aruna sabane 
 
 
राहुलच्या पुस्तकातील विचार आणि निखिलच्या पुस्तकातील चित्रे माणसाच्या मनावरील ताण नाहीसा करतात, असा दोन्ही पुस्तकांची गोरवोल्लेख करीत अरुणा सबाने म्हणाल्या, ‘द कप ऑफ टी’ जपानी तत्वांवर आधारित असले तरी मुळात हे बुद्धाचे तत्वज्ञान आहे. तर, ‘अ स्केचर्स बूक’मधील रेषा आपल्याशी हितगुज करीत मनाला अतीव आनंद आणि प्रेरणा देतात, असे मत त्यांनी व्यत केले.aruna sabane पुस्तकांबाबत समाज उदासीन झालेला असताना आज युवा लेखक आपले पुस्तक प्रकाशित करीत आहेत, प्रकाशन संस्था चालवीत आहेत, हे चित्रच आशादायी आहे, असे प्रतिपादन प्रा. नवनीत देशमुख यांनी केले. यावेळी मुरलीधर बेलखोडे यांनी वृक्ष व पुस्तकांचे मानवी जीवनातील मूल्य आपल्या भाषणातून मांडले. महेश मोकलकर यांनी स्थापत्यकलेतील रेखाटन कौशल्य आणि कल्पकतेवर प्रकाश टाकला. यावेळी निखिल अवथनकर व राहुल राऊत या युवा लेखकांनी ओघवत्या शैलीत संवाद साधत लेखन व पुस्तकनिर्मितीमागील आपली भूमिका स्पष्ट केली.
या समारोहात विदर्भ साहित्य संघाच्या उपाध्यक्षपदी तसेच अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या संमेलन निधी विश्वस्तपदी निवड झाल्याबद्दल अरुणा सबाने यांचा वि. सा. संघाच्या वर्धा शाखेद्वारे सत्कार करण्यात आला.
या लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटन वृक्षरोपाला जलसिंचन तसेच पुस्तकांच्या मुखपृष्ठ चित्रफलकाचे अनावरण करून करण्यात आले. प्रास्ताविक संजय इंगळे तिगावकर, संचालन मंजुषा ठाकरे चौगावकर यांनी केले. तर आभार प्रा. पद्माकर बाविस्कर यांनी मानले.
या आयोजनात वि. सा. संघाच्या कार्यकारिणी सदस्य प्रा. मीनल रोहणकर, डॉ. प्रमोद नारायणे, प्रीती तडस वाडीभस्मे, कविता बेदरकर, आदींनी सहकार्य केले.
ग्रंथनिर्मितीतील नवोदित प्रतिभावंतांचे योगदान महत्त्वाचे असून या नव्या प्रवाहांमुळे परिवर्तन घडून येईल अशी आशा प्रसिद्ध साहित्यिक व सामाजिक कार्यकर्त्या अरुणा सबाने यांनी विदर्भ साहित्य संघ वर्धा शाखेद्वारे आयोजित पुस्तक लोकार्पण समारोहात व्यत केली. स्थानिक निसर्ग सेवा समितीच्या ऑसिजन पार्कमध्ये आयोजित या कार्यक्रमात राहुल राऊत ‘सुगतो’ लिखित अ कप ऑफ टी आणि आर्किटेट निखिल अवथनकर लिखित ए स्केचर्स बुक या पुस्तकांचे लोकार्पण अरुणा सबाने यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कादंबरीकार प्रा. नवनीत देशमुख तर वृक्षमित्र मुरलीधर बेलखोडे उपविभागीय अभियंता महेश मोकलकर विदर्भ साहित्य संघाचे शाखाध्यक्ष संजय इंगळे तिगावकर