बालसंस्कार वर्ग शिबिराचा उत्साहात समारोप

    दिनांक :12-May-2026
Total Views |
नागपूर,
Public Welfare Committee रा. स्व. संघ, लोककल्याण समिती व सिद्धार्थ शाखेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात आलेले पंधरा दिवसांचे बालसंस्कार वर्ग शिबिर  काचोरे लॉन मागील मैदानावर उत्साहात संपन्न झाले.या शिबिरामध्ये मुलांना संस्कारवर्ग प्रार्थना, श्लोक, बडबडगीते, व्यायाम, हस्तकला, विविध पारंपरिक खेळ तसेच जीवनमूल्ये सांगणाऱ्या गोष्टी शिकविण्यात आल्या. यासोबतच वृक्षदिंडी, वेशभूषा स्पर्धा, डबा पार्टी, घरी सहज तयार करता येणारे खाऊचे पदार्थ, भोजन मंत्र व शांती मंत्र आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
 
 

rss 
 
 
शिबिराचा समारोप काचोरे लॉन मागील मैदानावर करण्यात आला. यावेळी वेशभूषा स्पर्धा व हस्तकला स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले. तसेच मुलांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आलीसमारोप कार्यक्रमाला अजनी भाग सेवा प्रमुख प्रकाश तांबोळी, सहसेवा प्रमुख पद्माकरसाठे, सिद्धार्थ प्रभात शाखेचे कार्यवाह . वंजारी, मुख्य शिक्षक पोलके, नरेंद्र नगर शारीरिक प्रमुख . अरूणसोराखे, अजनी भाग सहसंयोजिका अपूर्वा ठेमदेव तसेच संस्कार वर्ग शिक्षिका अनुराधा कठाळे, आश्लेषा बोढाळे,सुवर्णा सोराखे व रेणुका भारती उपस्थित होते.पालक व शाखाबंधूंच्या आर्थिक तसेच शारीरिक सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
सौजन्य :रतिका काशीमकर,संपर्क मित्र