तरनतारन,
bjp-office-attacked : पंजाबमधील तरनतारन जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली असून, येथील भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) कार्यालयावर अज्ञातांनी हल्ला केला आहे. सुमारे १५ ते २० हल्लेखोरांनी मिळून भाजप कार्यालयाची तोडफोड केल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही संपूर्ण घटना कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, पोलिसांनी आता हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अचानक आलेल्या या जमावाने कार्यालयात शिरून सामानाची मोठ्या प्रमाणावर नासधूस केली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये हल्लेखोर स्पष्टपणे दिसत असून पोलीस त्या आधारे त्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. भरदिवसा झालेल्या या हल्ल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पंजाबमधील कायदा आणि सुव्यवस्थेवर या निमित्ताने पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून, पोलीस या हल्ल्यामागील नेमका उद्देश काय होता, याचा तपास करत आहेत.

सौजन्य: सोशल मीडिया