आपत्ती व्यवस्थापनाशी कामे तातडीने पूर्ण करा : जिल्हाधिकारी

वर्धेत मान्सून पुर्वतयारी बैठक

    दिनांक :12-May-2026
Total Views |
वर्धा, 
re-Monsoon Preparedness in Wardha मान्सून काळात वेगवेगळ्या प्रकारचे आपत्कालीन प्रसंग उद्भवण्याची शयता असते. अशा संभाव्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी विभागांनी पूर्व तयारी करणे आवश्यक आहे. विभागांकडे याबाबत सोपविलेली कामे मे महिना अखेरपर्यंत पूर्ण करावीत. आपला स्वतंत्र आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करून सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी दिले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची मान्सून पूर्व तयारी आढावा बैठक जिल्हाधिकार्‍यांनी घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी संजय तेली, अतिरित जिल्हा पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपजिल्हाधिकारी प्रताप वाघमारे, राजू रणवीर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शुभम घोरपडे यांच्यासह सर्व विभाग प्रमुखांचे अधिकारी उपस्थित होते. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पूरस्थिती उद्भवल्यास बचाव पथके व साहित्याची तातडीने आवश्यकता भासते. त्यामुळे पथकातील मनुष्यबळाचे प्रशिक्षण, साहित्याची सुस्थिती याबाबी आताच तपासून घ्यावे. तहसिलदारांनी तालुकास्तरावर बैठका घेऊन संबंधितांना स्पष्ट सूचना द्याव्या. नदी काठावरील काही भागात वारंवार पाणी साचण्याच्या जागा असतात. अशा ठिकाणी आवश्यक उपाययोजना केल्या जाव्या. शहरे गावांमधील नाल्यांची सफाई, स्वच्छता करण्यात यावी, असेही निर्देश दिले.
 
 

re-Monsoon Preparedness in Wardha 
 
 
विभागांनी आपले आपत्ती व्यवस्थापन आराखडे २० मे पर्यंत आपत्ती व्यवस्थापन कक्षास सादर करावे तसेच विभागांतर्गत तालुका आणि गावपातळीवरील अधिकारी, कर्मचार्‍यांच्या बैठका घेऊन त्यांना योग्य प्रशिक्षण देण्यात यावे. आपत्तीकाळात संवादासाठी एका अधिकार्‍यास नोडल अधिकारी म्हणून नेमावे. १ जूनपासून नियंत्रण कक्ष सुरू करावे. शोध व बचाव साहित्यांची प्रत्यक्ष तपासणी करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.पाव साळ्यात ग्रामीण भागात रोगांच्या साथी पसरण्याची शयता असते. त्यादृष्टीने आरोग्य विभागाने पुरेसा औषधी साठा, ग्रामीण पाणी पुरवठ्याच्या विहीरींमधील पाणी दुषित होऊ नये, यासाठी आवश्यक उपाययोजना, तीन महिने पुरतील इतका अन्नधान्याचा साठा उपलब्ध ठेवण्यात यावा, असेही जिल्हाधिकारी म्हणाल्या. बैठकीला सर्व विभाग प्रमुख अधिकारी, सर्व उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तहसिलदार, मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते.