पुलगावात पदवीधरांची आढावा बैठक

सुशिक्षित मतदाराच्या नोंदणीसाठी सूक्ष्म नियोजनावर भर

    दिनांक :12-May-2026
Total Views |
पुलगाव,
meeting of graduates in pulgaon नाचणगाव येथील पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर सभागृहात नाचणगाव मंडळ व पुलगाव शहर मंडळातील नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकार्‍यांची पदवीधर मतदार नोंदणी संदर्भात आढावा व नियोजनात्मक बैठक ११ रोजी सायंकाळी ६ वाजता उत्साहात पार पडली.
 

pulgao 
 
 
या बैठकीला माजी आमदार तथा नागपूर विभागाचे पदवीधर मतदार नोंदणी प्रमुख सुधाकर कोहळे, सह-नोंदणी प्रमुख सुधीर दिवे यांनी पदवीधर नोंदणी प्रक्रियेबाबत विस्तृत माहिती देत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. आगामी पदवीधर निवडणुकीत प्रत्येक सुशिक्षित मतदारांची नोंदणी व्हावी, यासाठी सूक्ष्म नियोजनावर या बैठकीत भर देण्यात आला.meeting of graduates in pulgaon
याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष संजय गाते, माजी खासदार सुरेश वाघमारे, आमदार राजेश बकाने, नागपूरचे गिरीश देशमुख, पुलगाव शहर मंडळ अध्यक्ष प्रशांत इंगोले, नाचणगाव-गुंजखेडा मंडळ अध्यक्ष जयश्री मोकदम यांच्यासह पुलगाव शहरातील नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.