लागणार्‍या कच्च्या मालाच्या किमती गगनाला

    दिनांक :12-May-2026
Total Views |
दरवाढीचा सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना फटका
गॅस टंचाईनंतर आता महागाईचा फटका
कच्चा माल ३५ ते ५० टक्क्यांनी महागला
 
नामदेव भदे
नागपूर,
Rising Raw Material Prices in the Industry देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगाला आता कच्च्या मालाच्या दरवाढीचा फटका सहण करावा लागत आहे. उद्योगाला लागणारा कच्चा ३५ ते ५० टक्क्यांनी महागला आहे.या दरवाढीमुळे वेल्डिंग इलेक्ट्रोड्स, अ‍ॅल्युमिनियम, तांबे, प्लास्टीक आणि कार्बाईटच्या दरात मोठी वाढ झाली आहे.
 
 
MSME-one

ऑर्डर्सची पूर्तता करणे कठीण
मुख्यत: सध्या सुरू असलेल्या युध्दामुळे पोलाद आणि इतर कच्च्या मालाच्या किमतींमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. या अभूतपूर्व दरवाढीमुळे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांनाही सध्याच्या दरांवर आधारित पूर्तता करणे अत्यंत कठीण झाले असल्याची माहिती इलेक्ट्रोड्स निमति तसेच सायट्रॉन इंजिनीअरिंग प्रा. लि. संचालक जीवन घिमे यांनी दिली आहे.
मूलभूत दरांचा फेरविचार व्हावा
बुटीबोरीतील सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगाला कच्च्या मालाच्या दरवाढीमुळे नवे संकट निर्माण झाले आहे. वेल्डिंग इलेक्ट्रोड्स’ उद्योगाला कच्च्या मालाची गरज असते. सुक्ष्म, लघु आणि मध्यम प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने अनेक योजना आणल्या आहेत. मात्र आता उद्योग वाचविण्यासाठी मूलभूत दरांचा फेरविचार करण्याची वेळ आली आहे. दरवाढीमुळे उद्योगाच्या ऑर्डर्सवर परिणाम झाला आहे.
शासनाने लक्ष देण्याची गरज
सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगाला लागणार्‍या कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने उत्पादन खर्च प्रचंड वाढला आहे. त्यामुळे नवीन ऑर्डर्स नव्या दराने अडचणी येत आहेत. गॅस टंचाईमुळे आधीच उद्योग संकटात असताना आता कच्चा माल महागल्याने अनेक युनिट्स बंद होतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कच्च्या मालाच्या दरांमध्ये अंशतः सुधारणा झाल्यास अनेकांना मदत होणार आहे. याकडे शासनाने लक्ष देण्याची गरज बुटीबोरी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.
ठोस उपाययोजना आखण्याची गरज
Rising Raw Material Prices in the Industry  इराण इस्त्रायल युद्धामुळे उद्योग जगतास सर्वाधिक फटका बसण्यास सुरुवात झाली आहे. पोलाद व अ‍ॅल्युमिनियमसह इतर कच्चा मालाच्या दरात वाढ झाल्याने ईव्ही वाहने, घरगुती वापराची भांडी, ताराची किंमतीमध्ये सुध्दा वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बुटीबोरीतील सुक्ष्म,लघु व मध्यम उद्योगाला सावरण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने विशेष पॅकेज देण्याची गरज आहे.
सर्वच उद्योगाला विजेचे दर लागू असल्याने वीजेचा खर्च वाढला आहे. युद्धामुळे निर्माण झालेल्या गॅस टंचाईची झळ सहण करीत असताना आता कच्च्या मालाच्या झपाट्याने वाढणार्‍या किमतींमुळे उद्योग अडचणीत सापडले आहेत. यासाठी शासनाने ठोस उपाययोजना आखण्याची गरज कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतिया यांनी व्यक्त केली आहे.
आयात प्रक्रियेतील उत्पादन खर्च वाढला
गॅसवर अवलंबून असलेले उद्योग सध्या आपत्कालीन साठ्यावर सुरू असून, त्यांच्यावरही महाभयंकर परिस्थिती ओढावली आहे. यात आता कच्च्या मालाच्या दरवाढीने उद्योजकांची झोप उडवली आहे. अनेक लहान मोठया कंपन्या कच्चा मालाच्या आयातीवर अवलंबून असल्याने आयात प्रक्रियेतील अडथळ्यांमुळे उत्पादन खर्च वाढला आहे. याशिवाय संपूर्ण पुरवठा यंत्रणेवर व्यापक परिणाम होण्याची चेंबर ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्री अँड ट्रेडचे अध्यक्ष दिपेन अग्रवाल यांनी व्यक्त केली आहे.