किडनी प्रकरणातील रोशन कुळे यांना दिलासा

5 लाखांची मदत मंजूर; आ. मुनगंटीवार यांच्या पुढाकार

    दिनांक :12-May-2026
Total Views |
चंद्रपूर, 
Roshan Kule in Kidney Case नागभीड तालुक्यातील मिंथुर येथील रोशन कुळे यांच्या कुटुंबावर ओढवलेल्या आर्थिक संकटाला अखेर दिलासा मिळाला आहे. सावकारीच्या जाचामुळे आणि कर्जाच्या विळख्यात अडकून किडणी विक्रीसारख्या वेदनादायी घटनेला त्यांना सामोरे जावे लागले. त्यांना आता मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लक्ष रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे. राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी यासाठी पुढकार घेतला होता.
 
 
Decrease in milk
 
 
कुळे यांची शेतजमिनी सावकारांकडे गहाण असल्याने संपूर्ण कुटुंब अडचणीत आले होते. या पृष्ठभूमीवर रोशन कुळे यांनी, आ. मुनगंटीवार यांच्याकडे आपली कैफियत मांडली होती. त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लक्ष रुपये अर्थसहाय्य मंजूर करण्यासाठी शासनाकडे अधिकृत पत्रव्यवहार करीत सातत्याने पाठपुरावा केला. अखेर मुख्यमंत्री फडणवीस यांनी रोशन कुळे यांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लक्ष रुपये मंजूर करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, येत्या 19 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते रोशन कुळे यांना 5 लक्ष रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात येणार आहे.