वर्धा,
Samudrapur By-election नगरपंचायत समुद्रपूर प्रभाग १६ मधील एका रित पदाचा पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.नगरपंचायत समुद्रपूर मधील प्रभाग १६ येथील रित एका जागेसाठी नामनिर्देशन पत्र नगरपंचायत कार्यालय समुद्रपूर येथे १८ ते २५ मे या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत स्वीकारण्यात येणार आहे. २३ व २४ मे रोजी (शनिवार व रविवार) या शासकीय सुटीच्या दिवशी नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येणार नाही. नामनिर्देशन पत्राची छाननी २६ मे रोजी सकाळी ११ वाजता पासून करण्यात येईल. वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याची तारीख २६ मे अशी आहे. उमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख, उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याची तारीख अपील नसेल तेथे २७ मे ते २ जून असा आहे. अपील असल्यास अपिलाचा निर्णय ज्या तारखेस करण्यात येईल त्या तारखेनंतर तिसर्या दिवशी किंवा तत्पूर्वी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी ११ ते दुपारी ३ कालावधीत, मात्र ११ जून रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत देण्यात येईल.

निवडणूक चिन्ह नेमून देण्याची तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणार्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याची तारीख अपील नसेल तेथे २ जून रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत आहे. अपील असल्यास ११ जून रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत आहे. मतदान घेण्याची तारीख २० जून रोजी सकाळी ७.३० पासून ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत अशी आहे. मतमोजणी व निकाल तहसील कार्यालयात २१ जून रोजी सकाळी १० वाजल्यापासून सुरू होईल. या पोटनिवडणुकीसाठी तहसीलदार कपिल हाटकर निवडणूक निर्णय अधिकारी असतील तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नपंच्या मुख्याधिकारी पौर्णिमा गावित काम पाहतील, असे जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी कळविले आहे.