संजय कपूरचा मालमत्ता संघर्ष शिगेला!

राणी कपूर यांची सुप्रीम कोर्टात धाव

    दिनांक :12-May-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Sanjay Kapoor's Property Dispute दिवंगत उद्योगपती आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांचे माजी पती संजय कपूर यांच्या अंदाजे ३०,००० कोटी रुपयांच्या मालमत्तेवरून सुरू असलेला कौटुंबिक वाद आता थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला आहे. त्यांच्या निधनानंतर सुरू झालेल्या या वादात कुटुंबातील सदस्यांमध्ये संपत्ती आणि कंपनीच्या नियंत्रणावरून संघर्ष अधिक तीव्र झाला आहे.संजय कपूर यांच्या आई राणी कपूर यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत त्यांच्या दिवंगत मुलाच्या तिसऱ्या पत्नी प्रिया सचदेव कपूर यांच्यासह संबंधित पक्षांना आरके फॅमिली ट्रस्टच्या कारभारात हस्तक्षेप करण्यापासून रोखण्याची मागणी केली आहे.
 
 

sanjay kapur 
याचिकेत विशेषतः रघुवंशी इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या संचालक मंडळाच्या १८ मे रोजी होणाऱ्या बैठकीला स्थगिती देण्याची विनंती करण्यात आली आहे. ही बैठक ८ मे रोजी जारी करण्यात आलेल्या नोटीसमधून बोलावण्यात आली होती आणि त्यामध्ये अतिरिक्त संचालकांची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव असल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणावर सुनावणी करताना न्यायमूर्ती जे. बी. परडीवाला यांच्या खंडपीठाने पुढील सुनावणी १४ मे रोजी ठेवली आहे.