60 कैद्यांनी घेतला लाभ
यवतमाळ,
Skill Development Training for Prison Inmatesकारागृहातील कैद्यांना कारागृहातून बाहेर पडल्यानंतर सन्मानपूर्वक जीवन जगता यावे, तसेच पुन्हा गुन्हेगारीकडे न वळता रोजगार व स्वयंरोजगाराच्या माध्यमातून स्वतःचे आणि कुटुंबाचे उदरनिर्वाह करता यावा, यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रांच्या माध्यमातून कारागृहात मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण उपक्रम राबविण्यात येत आहे.
या उपक्रमास जिल्हाधिकारी विकास मीना तसेच महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीने विशेष मंजुरी दिली आहे. या अंतर्गत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व जिल्हा कारागृहाच्या विद्यमाने कौशल्य विकास विभागाच्या नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत कैद्यांसाठी प्रशिक्षण आयोजित केले जात आहे.
Skill Development Training for Prison Inmates प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील एलईडी लाईट दुरुस्ती तंत्रज्ञ हा कोर्स कैद्यांसाठी राबविण्यात येत असून, या प्रशिक्षणाचा लाभ 60 कैद्यांना दिला जात आहे. तीन महिन्यांच्या कालावधीचा हा अभ्यासक्रम पूर्णपणे मोफत असून, प्रशिक्षणाद्वारे तांत्रिक कौशल्य आत्मसात करण्याची संधी उपलब्ध होत आहे. या उपक्रमामुळे कैद्यांमध्ये स्वावलंबन व आत्मविश्वास वाढण्यास मदत होणार आहे.