भयावह नजरेची 'रंगी'! स्मिता पायगुडे अंजुटेचा 'घबाडकुंड'मध्ये धमाका

    दिनांक :12-May-2026
Total Views |
मुंबई:
ghabadkund-movie : थिएटर आणि मेकअप क्षेत्रातील अनुभवी नाव असलेल्या स्मिता पायगुडे अंजुटे आता रुपेरी पडद्यावर एका रहस्यमयी भूमिकेतून प्रेक्षकांना घाबरवायला सज्ज झाल्या आहेत. 'घबाडकुंड' या आगामी चित्रपटात त्या 'रंगी' ही व्यक्तिरेखा साकारत असून, या पात्राचे कनेक्शन थेट 'ब्लॅक मॅजिक'च्या गूढ जगाशी आहे. निर्माते रसिक कदम आणि दिग्दर्शक प्रीतम एस. के. पाटील यांचा हा थरारक चित्रपट येत्या १९ जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
 
 
ghabadkund-movie
 
 
स्मिता यांनी साकारलेली 'रंगी' ही व्यक्तिरेखा आपल्या तीक्ष्ण नजरेने आणि भीतीदायक वावरण्याने कथानकात मोठी खळबळ उडवून देणार आहे. या भूमिकेसाठी स्मिता यांनी आपल्या रंगभूमीचा अनुभव आणि मेकअप आर्टिस्ट म्हणून असलेली नजर यांचा खुबीने वापर केला आहे. "नजरेत धग अन् रग हिच्या अंगी, भल्या-भल्यांना घाम फोडते... नाव हिचं रंगी...!" ही टॅगलाईनच या पात्राची दहशत स्पष्ट करते. स्वतः स्मिता यांनीही ही भूमिका अत्यंत आव्हानात्मक असल्याचे सांगत, 'रंगी' प्रेक्षकांच्या मनात कायमची घर करेल असा विश्वास व्यक्त केला आहे.