नागपूर,
sonegaon nagpur राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, लोककल्याण समिती तथा दुर्गा मंदिर प्रभात शाखा, सोनेगाव यांच्या वतीने यावर्षी ७ ते १३ वयोगटातील मुलांसाठी बालसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होतेशिबिराचा प्रारंभ भारतमाता पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आला. दररोज वर्ग प्रार्थना, विविध श्लोक व देशभक्तीपर गीतांनी शिबिराची सुरुवात होत असे. त्यानंतर शरीर संचालन, विविध आसने, सूर्यनमस्कार यांचे प्रशिक्षण देण्यात आले. मुला-मुलींसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते.

मुलांमध्ये कलेची आवड निर्माण व्हावी यासाठी दोन दिवस चित्रकला व हस्तकला प्रशिक्षण देण्यात आले. तसेच पर्यावरण, रस्ते वाहतूक व आरोग्य क्षेत्रातील मान्यवरांना मार्गदर्शनासाठी आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी मुलांशी संवाद साधून विविध विषयांवर माहिती दिली.शिबिरादरम्यान विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली. तसेच पालकांची बैठक सोमलवाडा नगर सेवा प्रमुख . किशोर वैद्य यांच्या उपस्थितीत पार पडली.sonegaon nagpur त्यांनी पालकांना मार्गदर्शन केले.शिबिराचा समापन समारंभ नगरसेविका मायाहाडे व सोमलवाडा नगर सेवा प्रमुख किशोर वैद्य यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी मुलांनी वैयक्तिक व सांघिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. दुर्गा मंदिर सोनेगाव शाखेतर्फे सर्व मुलांना ‘मुलांचे मासिक’ सुट्टी विशेषांक तसेच भारत भारती निर्मित पुस्तकांचे वितरण करण्यात आले.
सौजन्य: हेमंत घरोटे,संपर्क मित्र