हिंगणघाट,
Taking note of that statement हिंगणघाट शहरातील भटया कुत्र्यांचा वाढत्या त्रासामुळे अनेक समस्या उद्भवत होत्या. लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक, शाळकरी मुले यांना कुत्रं चावण्याच्या घटनाही वाढत चालल्या होत्या. शहरातील कुत्र्यांचा वाढती समस्या नगरपालिका प्रशासनाने सोडवावी यासाठी उबाठा गटाच्या नगरसेवक राजश्री देवडे यांनी १५ जानेवारी रोजी निवेदन दिले होते. उशिरा का होईना त्या निवेदनाची दखल घेत नगरपालिका प्रशासनाने भटया कुत्र्यांच्या बंदोबस्त करण्यासाठी वेट फॉर अॅनिमल या संस्थेच्या माध्यमातून भटया कुत्र्यांच्या निर्जीवीकरण शस्त्रक्रिया व रेबीज लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली.
देवडे यांनी निवेदन दिल्यानंतर नगरपालिका व वेट फॉर अॅनिमल यांच्या संयुत वतीने शहरातील मोकाट कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी आणि निर्जीबीकरण शस्त्रक्रिया व रेबीज लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. शहरातील नागरिकांनी या महत्त्वपूर्ण उपक्रमात सहकार्य करावे असे आवाहन मनीषा देवढे यांनी केले आहे.