इराणवर यूएईचा गुप्त हल्ला?

अमेरिकन अहवालामुळे खळबळ

    दिनांक :12-May-2026
Total Views |
दुबई,
UAE's Secret Attack on Iran पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त अरब अमिराती (UAE) आणि इराण यांच्यातील तणाव आता अधिकच गडद होताना दिसत आहे. यूएईने कोणत्याही थेट लष्करी कारवाईत सहभाग नसल्याचे स्पष्टपणे सांगितले असले, तरी अमेरिकेतील प्रतिष्ठित ‘वॉल स्ट्रीट जर्नल’च्या अहवालामुळे नव्या चर्चांना तोंड फुटले आहे. अहवालानुसार, एप्रिलच्या सुरुवातीला इराणमधील काही महत्त्वाच्या ठिकाणांवर गुप्त हल्ले करण्यात आले होते. यामध्ये पर्शियन आखातातील लावान बेटावरील तेल शुद्धीकरण प्रकल्पाचाही समावेश असल्याचा दावा करण्यात आला आहे. या हल्ल्यामुळे प्रकल्पात मोठी आग लागली आणि उत्पादन क्षमतेला फटका बसल्याचे सांगितले जात आहे.
 
UAE 
ही घटना त्या काळात घडल्याचे सांगितले जात आहे, जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरोधातील लष्करी मोहिमेनंतर युद्धविरामाची घोषणा केली होती. इराणने या घटनेनंतर “शत्रूराष्ट्राचा हल्ला” असा आरोप करत आखाती देशांवर प्रत्युत्तरात्मक कारवाई केली. यूएई आणि कुवेतकडे क्षेपणास्त्रे व ड्रोन डागण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, यूएई या आरोपांवर अधिकृत प्रतिक्रिया देताना कोणतीही जबाबदारी स्वीकारलेली नाही. अमेरिकेच्या व्हाईट हाऊसनेही या विषयावर थेट भाष्य टाळले आहे. संघर्ष तीव्र होत असताना आखाती देशांनी सुरुवातीला आपली हवाई हद्द आणि लष्करी तळ इराणविरोधी कारवायांसाठी वापरू दिले जाणार नसल्याचे सांगितले होते. मात्र, त्यानंतर इराणकडून आखाती भागातील विमानतळे, ऊर्जा प्रकल्प आणि शहरांवर मोठ्या प्रमाणावर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आले.
 
या हल्ल्यांमध्ये यूएई हे प्रमुख लक्ष्य ठरल्याचे समोर आले आहे. अहवालात दावा करण्यात आला आहे की, संघर्षाच्या काळात यूएईवर तब्बल २,८०० हून अधिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागण्यात आले. यामुळे विमान वाहतूक, पर्यटन आणि रिअल इस्टेट क्षेत्राला मोठा आर्थिक फटका बसला. अनेक कंपन्यांना कर्मचाऱ्यांची कपात आणि सक्तीच्या रजा लागू कराव्या लागल्याचेही सांगितले जात आहे. याचदरम्यान काही ओपन-सोर्स संशोधकांनी प्रसिद्ध केलेल्या छायाचित्रांमध्ये फ्रेंच बनावटीची मिराज लढाऊ विमाने आणि चीनची विंग लूंग ड्रोन इराणी हवाई क्षेत्राजवळ दिसल्याचा दावा करण्यात आला आहे. ही दोन्ही उपकरणे यूएईच्या ताफ्यात असल्यामुळे संशय अधिक वाढला आहे. इराणने सातत्याने यूएईवर अमेरिका आणि इस्रायलसोबत संगनमत केल्याचा आरोप केला आहे. दुसरीकडे, यूएईने होर्मुझ सामुद्रधुनीतील जहाजांच्या सुरक्षेसाठी संयुक्त राष्ट्रांमध्ये काही ठरावांना पाठिंबा दिला असून, दुबईतील इराणशी संबंधित आर्थिक व्यवहारांवरही निर्बंध आणण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पश्चिम आशियातील हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
 
पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त अरब अमिराती (UAE) आणि इराण यांच्यातील तणाव आता अधिकच गडद होताना दिसत आहे. यूएईने कोणत्याही थेट लष्करी कारवाईत सहभाग नसल्याचे स्पष्टपणे सांगितले असले, तरी अमेरिकेतील प्रतिष्ठित ‘वॉल स्ट्रीट जर्नल’च्या अहवालामुळे नव्या चर्चांना तोंड फुटले आहे. अहवालानुसार, एप्रिलच्या सुरुवातीला इराणमधील काही महत्त्वाच्या ठिकाणांवर गुप्त हल्ले करण्यात आले होते. यामध्ये पर्शियन आखातातील लावान बेटावरील तेल शुद्धीकरण प्रकल्पाचाही समावेश असल्याचा दावा करण्यात आला आहे. या हल्ल्यामुळे प्रकल्पात मोठी आग लागली आणि उत्पादन क्षमतेला फटका बसल्याचे सांगितले जात आहे.