कोणार्कच्या विरोधात कामगारांचे आंदोलन

शहरातले कचर संकलन थांबले

    दिनांक :12-May-2026
Total Views |
अमरावती,
workers-protest-against-konark : महानगरपालिकेच्या कचरा संकलनाच्या कामावर कार्यरत कामगारांनी मंगळवारी कामबंद आंदोलन पुकारल्याने शहरातील संकलनाची व्यवस्था विस्कळीत झाली. कोणार्क कंपनी व प्रशासनाच्या धोरणाचा निषेध व्यक्त करीत इर्विन चौक येथे कामगारांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. दरम्यान उपमहापौर सचिन भेंडे, स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर याच्या मध्यस्थीनंतर तब्बल चार तासांनी आंदोलन स्थगित करण्यात आले.
 
 
 
amt
 
 
अमरावती महानगरपालिकेच्या कचरा संकलनाचा कंत्राट घेणार्‍या कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीविरोधात कामगारांच्या संतापाचा मंगळवारी उद्रेक पाहावयास मिळाला. कंपनीच्या ९४ चालक व मदतनीस यांनी संप पुकारून इर्विन चौकात ठिय्या दिला. गेल्या महिनाभराचे वेतन थकीत ठेवून तब्बल सहा महिन्यांपासून ईपीएफ व ईएसआयसीची रक्कम कंपनीने भऱली नसल्याचा आरोप या कर्मचार्‍यांनी केला. वेतन न मिळाल्याने आर्थिक अडचणीत सापडलेल्या कामगारांनी कंपनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करीत ठीय्या आंदोलन केले. अखेर कंपनीच्या अधिकार्‍यांनी आंदोलनस्थळी भेट देवून कामगारांची समजूत काढली. कामगारांना दहा तारखेच्या आत वेतन देण्यात येईल तसेच लवकरच ईपीएफ व ईएसआयसीची रक्कम अदा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. महापालिका प्रशासनाने या गंभीर प्रकारावर हात झटकत मौन बाळगल्याचा आरोप कर्मचार्‍यांकडून करण्यात आला. आंदोलन चिघळत असल्याचे बघता कंपनीच्या वतीने लारेफ अहमद, जमील खान यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन कर्मचार्‍यांची समजूत काढली.