यवतमाळ अर्बन बँकेचा पुन्हा एक सामाजिक उपक्रम

    दिनांक :12-May-2026
Total Views |
कळंब,
Yavatmal Urban Bank: Drinking Water संपूर्ण महाराष्ट्रात सामाजिक उपक्रमासाठी ख्याती असलेल्या यवतमाळ अर्बन बँकेच्या वतीने श्री चिंतामणीच्या कळंब नगरीत बसस्थानकावर बँकेचे अध्यक्ष डॉ. नितीन खर्चे यांचे हस्ते पाणपोई जनतेच्या सेवेत समर्पित केली आहे. यवतमाळ अर्बन बँकेने कळंबला येणाèया भाविकांकरिता तथा बस स्थानकावरून ये-जा करणाèया प्रवाशांची तहान भागविण्याकरिता यवतमाळ अर्बन बँकेच्या वतीने बस स्थानकावर पाणपोई सुरू करण्यात आली आहे.
 
 
panpoi
 
Yavatmal Urban Bank: Drinking Water  यावेळी अध्यक्षीय भाषणामध्ये डॉ. खर्चे म्हणाले, यवतमाळ अर्बन बँक ही देश तथा सामाजिक हित जोपासणारी बँक असून परिवहन विभागाकडून आलेल्या सूचनेची तत्काळ दखल घेत आम्ही कळंब येथे पाणपोईची व्यवस्था केली आहे. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघचालक सुरेश कठाळे, बँकेच्या संचालक मीरा घाटे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीधर कोहरे, अधिकारी गजानन वैद्य, सहायक सरव्यवस्थापक सुनील खातखेडकर, एसटीचे शरद राठोड, हेमंत जाधव, भाजपा तालुकाध्यक्ष मनोज काळे, काँग्रेसचे अशोक उमरतकर, बँकेच्या शाखा व्यवस्थापक भैरवी वुईके तथा कर्मचारी सुधाकर लोहकरे, महेश धनरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन अधिकारी विकास वाघमारे यांनी व आभारप्रदर्शन बँकेच्या कर्मचारी अनुश्री देशपांडे यांनी केले. यावेळी बँकेचे सर्व कर्मचारी, दैनिक ठेव प्रतिनिधी तथा नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.