मंगरूळनाथ,
Ambe distribution in Mangroolnath भीषण उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर, सामान्यांच्या ओठांना गोडवा मिळावा या उद्देशाने नंदलाल पवार मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही आंबे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गेली अनेक वर्षे अविरतपणे सुरू असलेला हा उपक्रम यंदाही उत्साहात पार पडला.येथील नगरसेवक नंदलाल पवार हे दरवर्षी त्यांचे मित्र व स्नेही मंडळींना दोन महिने आठवड्यातून दोन वेळा आंब्याचे वाटप करतात.त्यांच्या मंडळाकडून ही परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून जोपासली जात आहे. परिसरातील नागरिक, मित्र गरजू कुटुंबांना ११ मे रोजी आंब्यांचे वितरण करण्यात आले. उन्हाचा तडाखा लक्षात घेता,सकाळीच शिस्तबद्ध पद्धतीने नियोजन करून हे वितरण पार पडले.कार्यक्रमाचे आयोजक नंदलाल पवार यांनी यावेळी बोलताना सांगितले की, आजच्या महागाईच्या काळात आंबा हा सामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहे.
समाजाप्रती असलेले आपले ऋण फेडण्यासाठी आणि सर्वांना या फळांचा आनंद घेता यावा, यासाठी आमचे मित्र मंडळ दरवर्षी हा छोटासा प्रयत्न करते.केवळ सण-उत्सव साजरे न करता, लोकांशी थेट जोडले जाणारे असे उपक्रम राबवल्याने सामाजिक एकोपा वाढतो. असे ते म्हणाले. यावेळी मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सकाळपासूनच वितरणाची तयारी केली होती. मंडळाच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. यावेळी मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.