नागपूर,
Dnyaneshwar Rakshak आजच्या काळात लहान मुलांच्या मनावर संत-महापुरुषांच्या विचारांचे संस्कार होणे अत्यंत आवश्यक आहे. मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे अनेक बालके त्याच्या आहारी जात असून पालकांमध्ये भविष्यातील पिढीबाबत चिंता निर्माण झाली आहे. त्यामुळे मुलांमध्ये चांगले संस्कार, मानवता आणि समाजाभिमुख विचार रुजविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन श्री गुरुदेव युवा मंचचे प्रवर्तक तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि महापुरुषांच्या विचारांचे अभ्यासक ज्ञानेश्वर रक्षक यांनी केले.

अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या प्रणालीनुसार आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी आणि रवि मानव यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील विविध ठिकाणी बालसंस्कार शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. ही शिबिरे आजच्या नव्या पिढीसाठी सुवर्णसंधी असून पालकांनी आपल्या मुलांना या शिबिरात सहभागी करून घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या सामुदायिक प्रार्थना, सामुदायिक ध्यान आणि मानवता धर्माच्या शिकवणीतील मूल्ये आजच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे कार्य श्री गुरुदेव सेवा मंडळ विविध माध्यमांतून करत असल्याचे त्यांनी सांगितले. Dnyaneshwar Rakshak महापुरुषांनी ग्रामगीता आणि इतर साहित्याच्या माध्यमातून मानवतेचा संदेश दिला असून पालकांनीही त्याच विचारांचा वारसा पुढे नेण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी श्री गुरुदेव सेवा मंडळाचे माजी ग्रामसेवाधिकारी गोपाल सिंगुरकर आणि सचिव गंगाधरराव घोडमारे यांच्या हस्ते ज्ञानेश्वर रक्षक यांचा सत्कार करण्यात आला. Dnyaneshwar Rakshak तसेच पिसे यांचा सत्कार अॅड. सोनिया खोरगडे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाला शिबिराचे प्रशिक्षक सप्तखंजरीवादक मोहनदास चोरे, बावनकुळे गुरुजी, डॉ. चर्जन साहेब, मानकर साहेब, अरुणराव खाजोणे, चालखोर, प्रणाली तिजारे, शिबिर संयोजक आदर्श कोळमकर, सप्तखंजरीवादक व प्रशिक्षक आकाशपाल निस्ताने महाराज, कीर्तनकार बेव्हणे महाराज आदी मान्यवर उपस्थित होते.
सौजन्य: ज्ञानेश्वर रक्षक, संपर्क मित्र