तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
cattle-rescued : शिरपूर पोलिसांनी मंगळवार, 12 मे रोजी मध्यरात्री केलेल्या कारवाईत गोवंश तस्करीचा डाव उधळून 34 गोवंशाची सुटका केली. या कारवाईत गोवंशासह 26 लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सहायक पोलिस निरीक्षक संतोष मनवर यांनी मिळालेल्या माहितीवरून, शिरपुर ते चारगांव चौकी येथे नाकाबंदी केली. वणी ते शिरपूर मार्गाने येणाèया संशयित अशोक लेलॅन्ड कंटेनरला थांबवून तपासणी केली असता वाहनात 34 गोवंशिय बैल एकमेकांना आखूड दोरीने बांधलेले दिसले.
याबाबत विचारणा केली असता कुठल्याही प्रकारची कागदपत्रे व समाधानकारक उत्तर न मिळाल्याने या वाहनात कत्तलीसाठी गोवंश जातीची जनावरे घेऊन जात असल्याची खात्री झाल्याने त्यांना ताब्यात घेतले. या प्रकरणी, सरगम गुलाबसिंग धुर्वे याला विचारणा केली असता त्याने ही गोवंशीय तस्करी तोसिक अहमद (ताजबाग, नागपूर) व ईरफान (गडचांदूर जि. चंद्रपूर) यांच्या सांगण्यावरुन करीत असल्याचे सांगितले. पोलिसांनी वाहन क्र. एनआय01 एजी1288 व 34 गोवंशिय बैल असा 26 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपीविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा 1976 (सुधारणा 2015) कलम 5,5 (अ), 5 (ब), 9 (अ) सहकलम प्राण्यांना क्रुरतेने वागविण्यास प्रतिबंधक अधिनियम कलम 11, 11(1), (घ), (ङ), (च), (ज) सहकलम 119 महाराष्ट्र पोलिस कायदा सहकलम 83,184/177 मोटार वाहन कायद्यांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलिस अधिकारी वणी, सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनात शिरपूरचे ठाणेदार संतोष मनवर, पोलिस उपनिरीक्षक धीरज गुल्हाने, इकबाल शेख, प्रशांत झोड, अविनाश बानकर, मंगेश सलाम, विजय फुलुके, किरण दासरवार यांनी पार पाडली.