सीबीएसई 12 वीचा निकाल जाहीर

    दिनांक :13-May-2026
Total Views |
नवी दिल्ली
CBSE Result बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली असून सीबीएसई बोर्डाने 12वी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. निकालानुसार बारावीचे एकूण 85.20 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
 

cbse 
CBSE Result यंदा पुन्हा या निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 88.86 टक्के असून 82.13 टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत. म्हणजेच मुलांच्या तुलनेत मुलींनी 6.73 टक्के चांगले प्रदर्शन केले आहे.
CBSE Result राज्य मंडळाप्रमाणेच सीबीएसई बोर्डही गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांची यादी जाहरी करत नाही. कोरोनानंतर सीबीएसईने गुणवत्ता यादी जाहीर करणे बंद केले होते. तेव्हापासून आजतगायत अशी यादी जाहीर केली जात नाही.