शिवप्रिया टॉवरमध्ये बालसंस्कार शिबिर उत्साहात

    दिनांक :13-May-2026
Total Views |
नागपूर,
Shivpriya Tower जयताळा येथील शिवप्रिया टॉवरमध्ये विश्व मांगल्य सभा, नागपूर यांच्या वतीने आयोजित ग्रीष्मकालीन बालसंस्कार दरम्यान उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. शिबिराचे उद्घाटन शिवप्रिया टॉवरमधील ज्येष्ठ नागरिक अंबलकर आणि आगरकर काका यांच्या हस्ते करण्यात आले. शिबिरादरम्यान दररोज सूर्यनमस्कार, पंचश्लोकी, गणपती स्तोत्र पठण, बोधकथा तसेच विविध बौद्धिक खेळांचे आयोजन करण्यात आले. याशिवाय अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमांमध्ये मुलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. मातृभाषा आणि राष्ट्रभाषेवरील पोस्टर तयार करणे, विशेष प्रकारची रांगोळी, अक्षर रेखाटन यांसारख्या उपक्रमांसोबतच पक्ष्यांसाठी दाण्याचे घर तयार करणे आणि पारंपरिक मराठी पद्धतीतील पानदानाची ओळख करून देण्यात आली.
 
Shivpriya Tower
 
शिबिराला वैभव देवघरे, पारिजात पाल, पायल सिंग, शिल्पा भगत, डॉ. भैरवी मांगलेकर आणि डॉ. प्रांजली पिंगळे यांचे सहकार्य लाभले. तसेच मुलांसाठी आयोजित करण्यात आलेली पेट्रोल पंप भेट हा शिबिरातील विशेष आकर्षणाचा भाग ठरला. नागपूर महानगर बालसभा संयोजिका मंजिरी अलोणी आणि नागपूर प्रांत सहसंयोजिका माधवी पळसोकर यांचे मार्गदर्शन शिबिराला लाभले. Shivpriya Tower शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी त्रिमूर्ती जिल्हा संयोजिका राधिका खेर, नम्रता खेर, मोनाली गाडगे, आशा काळे, अनुराधा चौधरी, सिंघेल आणि वैशाली अंबलकर यांनी विशेष परिश्रम घेतले. समारोप प्रसंगी शिवप्रिया टॉवर सोसायटीच्या वतीने शैलेश पळसोकर आणि उन्नी मेनन यांच्या हस्ते सहभागी मुलांना प्रमाणपत्रे आणि खाऊचे वितरण करण्यात आले.
सौजन्य: माधवी पळसोकर, संपर्क मित्र