शिवमंदिर शाखेत बाल संस्कार शिबिर उत्साहात

    दिनांक :13-May-2026
Total Views |
नागपूर,
Shivmandir Branch राष्ट्रीय स्वयंसेवक संघ लोककल्याण समितीतर्फे १ मे ते १० मे दरम्यान सोनेगाव येथील एच. बी. इस्टेट परिसरातील शिवमंदिर शाखेत लहान मुलांसाठी संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मुलांमध्ये धार्मिक, सामाजिक तसेच देशप्रेमाची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने देशभरात अशा प्रकारची शिबिरे आयोजित केली जातात शिबिराची सुरुवात डॉ. निमिषे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर विविध उपक्रमांना प्रारंभ झाला. डॉ. निमिषे यांनी मुलांना श्लोक शिकवून त्याचा अर्थ सोप्या भाषेत समजावून सांगितला तसेच तो पाठ करण्यास प्रोत्साहित केले.

Shivmandir Branch
दहा दिवसांच्या शिबिरात मुलांना राष्ट्रगीत, श्लोक, गणपती अथर्वशीर्ष, विविध खेळ आणि चित्रकला यांचे प्रशिक्षण देण्यात आले. शिबिरादरम्यान साठे यांनी पर्यावरणाचे महत्त्व मुलांना समजावून सांगितले, तर डबली यांनी वाहतुकीचे नियम आणि त्यांचे पालन करण्याबाबत मार्गदर्शन केले. Shivmandir Branch शिबिरात दररोज सुमारे ३० ते ३५ मुले सहभागी होत होती. या शिबिरासाठी रुखमांगद, आरती देव, शिपोरकर, मिश्रा, संपदा करगुटकर, मयुरी कुलकर्णी आणि चौधरी यांनी विविध उपक्रमांचे नियोजन करून मुलांना मार्गदर्शन केले. तसेच दररोज मुलांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात येत होती.
 
समारोपाच्या दिवशी मुलांनी शिबिरात शिकलेल्या गोष्टींचे प्रात्यक्षिक सादर केले. यानंतर पथनाट्याचे आयोजन करण्यात आले. समारोप प्रसंगी वैभव शिपोरकर यांनी छोट्या-छोट्या संस्कारक्षम गोष्टींच्या माध्यमातून मुलांना चांगले विचार, योग्य आचरण आणि सुदृढ मन व शरीराचे महत्त्व पटवून दिले. Shivmandir Branch तसेच पालकांनाही मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शन करण्यात आले. पसायदान आणि भोजन मंत्रानंतर “भारत माता की जय”च्या घोषणांनी कार्यक्रमाची सांगता झाली.
सौजन्य: हेमंत घारोटे, संपर्क मित्र