आरोग्य विभागातील सोयीच्या पोस्टिंगला बसणार ‘चाप’

30 जूनपासून होणार पदमुक्ती

    दिनांक :13-May-2026
Total Views |
समीर मगरे,
यवतमाळ, 
health-department : राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागात वर्षानुवर्षे सुरु असलेल्या सोयीच्या राजकारणावर शासनाने अखेर चाप लावला आहे. विशेषज्ञाचे शिक्षण घेऊनही ग्रामीण किंवा उपजिल्हा रुग्णालयात सेवा देण्याऐवजी, प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा तालुका आरोग्य अधिकारी म्हणून संवर्ग बदलून बसलेल्या डॉक्टरांना आता मूळ कर्तव्यावर जावे लागणार आहे.
 
 

ytl 
 
 
 
30 जूनपासून या सर्व डॉक्टरांना कार्यमुक्त करण्याचे आदेश सार्वजनिक आरोग्य विभागाने प्रधान सचिव-1 निपुण विनायक यांनी सोमवार, 11 मे रोजी निर्गमित केल्याने, आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे. शासनाने अशा डॉक्टरांची यादी जाहिर केली आहे. यात यवतमाळ जिल्ह्यातील जवळपास 46 डॉक्टरांचा समावेश आहे.
 
 
शासकीय खर्चातून किंवा विशेष कोट्यातून एमडी, एमएस सारख्या पदव्या मिळवल्यानंतर या तज्ञ डॉक्टरांनी जिल्हा रुग्णालय किंवा उपजिल्हा रुग्णालयात सेवा देणे अपेक्षित होते. मात्र, अनेक डॉक्टरांनी आपल्या शहराजवळ किंवा जिल्हा परिषदेंतर्गत येणाèया प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये पदांवर वर्णी लावून बसले होते. परिणामी ग्रामीण भागातील रुग्णांना तज्ञ डॉक्टरांकडून उपचार मिळत नव्हता. मात्र, शासनाच्या या निर्णयामुळे आता ग्रामीण भागातील रुग्णांना तज्ञ डॉक्टरांकडून उपचार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
स्वतंत्रपणे होणार आदेश निर्गमित
 
 
जे डॉक्टर संवर्ग बदलून वैद्यकीय अधिकाèयांचे कर्तव्य करत आहे. त्या डॉक्टरांना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार त्यांचे त्यांच्या मूळ संवर्गात पदस्थापनेबाबतचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार आहे.