इंग्लंडच्या कराटे प्रशिक्षकांकडून नागपुरातील विद्यार्थ्यांना धडे

- तिसरे राष्ट्रीय कराटे प्रशिक्षण शिबिर संपन्न

    दिनांक :13-May-2026
Total Views |
नागपूर,
national-karate-training-camp : तिसरे राष्ट्रीय कराटे प्रशिक्षण शिबिरात इंग्लंड (युके) येथून आलेल्या शिहान गुरशरण सहोता यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विद्यार्थ्यांना प्रगत कराटेचे प्रशिक्षण देण्यात आले.
 
 
NGP
 
 
मार्शल आर्ट्स ट्रेनिंग असोसिएशन, नागपूर आणि टिस्का इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, १० मे रोजी डब्ल्यूसीएल, उमरेड येथील सभागृहात हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. आयडीएल ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक मुरलीधर केकापुरे प्रमुख पाहुणे तर डब्ल्यूसीएल उमरेडचे एजीएम अविनाश प्रसाद यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. जीएमओ एस. जी. वर्मा व रामू मोंढे पाहुणे म्हणून उपस्थित होते. हे शिबिर एम.ए.टी.ए. नागपूरचे अध्यक्ष शिहान विपिन हडके आणि सचिव शिहान अजय मोंढे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आले होते. शिहान गुरशरण सहोता यांनी सेमिनारमध्ये सिनियर ब्लॅक बेल्ट परीक्षा देखील घेतली आणि विद्यार्थ्यांनी त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीद्वारे कराटे ब्लॅक बेल्टचा उच्च दर्जा प्राप्त केला.
 
 
ब्लॅक बेल्ट १ली डिग्री : अश्विनी दिएवार, अंशुल हाडके, रिया ठाकूर, मधुरा वसू, जय धनुष्कर, वंश तुरकर, श्रावणी माहुरे, स्वरा राशी शेगावकर, आराध्या शेगावकर, आयुष तिजारे, साश बोरकर, गोटेफोडे व भक्ती बोरीकर
 
 
ब्लॅक बेल्ट २ री डिग्री: समृद्धी हाडके, स्वराली ठाकरे, सानिधी हाडके, माही मोंढे, गुंजन दांडेकर
 
 
ब्लॅक बेल्ट ३ री डिग्री: सेन्साई धनराज चंदनखेडे, सेन्साई सिकंदर कन्नौजे, सेन्साई अचल मेंढे
 
 
ब्लॅक बेल्ट ६ वी डिग्री: सेन्साई संजय शर्मा, सेन्साई आशिष नागदेवते, सेन्साई प्रशांत राऊत, सेन्साई कृष्णा सोळंकी, सेन्सी चिवंडे, सेन्साई सुषमा सातव, सेन्साई धीरज पाटील, सेन्साई नीलेश खंदारे, सेन्साई अनन्या मेश्राम, सेन्साई निखिल लोणेरे, सेन्साई अक्षय अकोटकर, सेन्साई पीयूष सातव, सेन्साई शौर्य कुर्वे, सेन्साई उत्कर्ष पराते यांनी सहकार्य केले.
 

NGP 
 
 
शिबिराच्या यशस्वितेसाठी ‘माता’ असोसिएशनचे सल्लागार अ‍ॅड. अनिल कांबळे व डॉ.पारस शंभरकर यांनी विशेष सहकार्य केले.विद्यार्थ्यांना आतंरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण मिळावे आणि अशा शिबीरातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण व्हावे, अशी प्रतिक्रिया आयोजक शिहान विपीन हाडके आणि शिहान अजय मोंढे यांनी दिली आहे.