वर्धा, १३ मे
Establishment of a new organization अस्सल देशी खेळ म्हणून पिढ्यानपिढ्यांची परंपरा लाभलेल्या खो-खो खेळाला विदर्भात सर्वदूर रुजविण्याकरिता वर्धेत मंगळवार १३ मे रोजी झालेल्या बैठकीत खो-खो इंडिया असोसिएशनची स्थापना करण्यात आली. विदर्भातून आलेल्या माजी खो-खो खेळाडू, तज्ज्ञ आणि या क्षेत्रातील अधिकारी-पदाधिकारी यांनी ज्येष्ठ समाजसेवक सुनील बुरांडे यांची एकमताने संघटनेच्या अध्यक्षपदी निवड केली.

या बैठकीत नागपूर येथील सुप्रसिद्ध उद्योगपती कमलेश ठवकर यांची सर्वानुमते संघटनेच्या कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली. उपाध्यक्ष : गोपाल राऊत आणि दिलीप मोरे, सचिव : विजय खोकले, सहसचिव : प्रा. सुरेश देशमुख (काटोल) आणि प्रा. हसमुख भट्टी, कोषाध्यक्ष : सतीश इखार तर सदस्य म्हणून योगेश काळे, विजय मोरे, प्रा. विजय येणुरकर, प्रफुल्ल देशमुख, अशोक राऊत, जयकुमार पारस्कर, मीरा तोंडले, रुचिता नासरे, नितीन बांबल यांची निवड करण्यात आली. तांत्रिक समितीत विजय मोटघरे, विजय येणुरकर, रेफ्री बोर्ड योगेश काळे, नितीन बांबल यांची निवड करण्यात आली. या संघटनेच्या माध्यमातून विदर्भात उदयोन्मुख खो-खो खेळाडूंचा शोध घेऊन त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर खो-खो खेळण्याकरिता प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन दिला जाईल, असा मानस नवनियुत अध्यक्ष सुनील बुरांडे यांनी व्यत केला.