भवन्स लॉयड्स विद्या निकेतनचा उत्कृष्ट निकाल

    दिनांक :13-May-2026
Total Views |
वर्धा,
bhavans-lloyds-vidya-niketan : भवन्स लॉयड्स विद्या निकेतनच्या विद्यार्थ्यांनी अखिल भारतीय वरिष्ठ माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (एआयएसएससीई) २०२५-२६ या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले.
 
 

LK
 
 
 
विद्यार्थ्यांनी विज्ञान व वाणिज्य या दोन्ही शाखांमध्ये उत्कृष्ट निकाल दिला. वाणिज्य शाखेमध्ये धु्रव राठी याने ९२.८० टके गुण मिळवत विद्यालयातून प्रथम क्रमांक पटकावला. युवराज सिंह आणि रोहन गोरसीया यांनी प्रत्येकी ९१.६० टके गुण मिळवून द्वितीय तर लौकिक बेद याने ९१.४० टके गुणांसह तृतीय क्रमांक पटकावला. तसेच सानिका ठुनुकले ९१ तर नील शिंदे याने ९०.२० टके गुण प्राप्त करून उल्लेखनीय यश संपादन केले.
 
 
विज्ञान शाखेत आदिती मून हिने ९२.६० टके गुणांसह प्रथम स्थान मिळवले. वेदांत तपासे ९१.२० टके गुण घेऊन द्वितीय तर शिवम कामिला याने ८७.८० टके गुणांसह तृतीय स्थान पटकावले. यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे विद्यालय व्यवस्थापन, प्राचार्य आणि शिक्षकांनी अभिनंदन केले.