सोने-चांदी महागणार! आयातीवर १५% शुल्क लागू

    दिनांक :13-May-2026
Total Views |
नवी दिल्ली,
gold and silver price देशात सोने, चांदी आणि इतर मौल्यवान धातूंच्या आयातीवर सरकारने मोठा निर्णय घेतला असून, आता या आयातीवर एकूण १५% शुल्क आकारले जाणार आहे. नवीन दर आजपासून लागू करण्यात आले असून याचा थेट परिणाम देशांतर्गत सोन्या-चांदीच्या किंमतींवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 
 
gold and silver price
 
 
सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, सोने आणि चांदीच्या आयातीवर १०% मूलभूत सीमा शुल्क (Basic Customs Duty) आणि ५% कृषी पायाभूत सुविधा आणि विकास उपकर (AIDC) लागू करण्यात आला आहे. या दोन्ही मिळून एकूण आयात शुल्क १५% पर्यंत पोहोचले आहे. यापूर्वी हे शुल्क कमी प्रमाणात होते, मात्र या वाढीमुळे मौल्यवान धातूंची आयात अधिक महाग होणार आहे.
या निर्णयामागे परकीय चलन साठ्यावर येणारा ताण कमी करणे आणि सोन्या-चांदीच्या मोठ्या प्रमाणातील आयातीवर नियंत्रण ठेवणे हा सरकारचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले जात आहे. विशेषतः दागिने उद्योग आणि औद्योगिक वापरासाठी होणाऱ्या आयातीवरही याचा परिणाम होणार आहे.
नवीन नियमांनुसार केवळ सोने-चांदीच नव्हे तर प्लॅटिनम, दागिन्यांचे घटक (जसे की हुक, कड्या, क्लॅम्प, पिन, स्क्रू बॅक) यांच्यावरही सुधारित दर लागू करण्यात आले आहेत. सोने आणि चांदीच्या घटकांवर ५% तर प्लॅटिनम घटकांवर ५.४% शुल्क आकारले जाणार आहे. तसेच पुनर्वापरासाठी आयात होणाऱ्या मौल्यवान धातूंच्या कचऱ्यावरही सुधारित अटींसह शुल्क लागू करण्यात आले आहे.
यासोबतच संयुक्त अरब अमिराती (UAE) मधून विशिष्ट कोट्याअंतर्गत होणाऱ्या सोन्याच्या आयातीवरील सवलतीच्या शुल्कातही बदल करण्यात आला आहे.gold and silver price पूर्वी मिळणाऱ्या सवलती आता कमी करण्यात आल्या असून त्यामुळे आयात खर्च आणखी वाढण्याची शक्यता आहे.
या निर्णयानंतर आंतरराष्ट्रीय बाजारातील दर आणि देशांतर्गत मागणी लक्षात घेता सोने-चांदीच्या किरकोळ किमतींमध्ये वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दागिने बाजार आणि गुंतवणूक क्षेत्रावरही याचा परिणाम दिसून येऊ शकतो.