अमरावती,
inter-state-thieves : शहर गुन्हे शाखेकडून घरफोडी करणारा आंतरराज्यीय दोन गुन्हेगार ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांचेकडून एकूण ८ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून १८ लाख ७ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याच टोळीतील चार गुन्हेगार फरार आहेत. त्यांचा शोध सुरू आहे.

गुन्हे शाखेचे पथक शहरातल्या चोरींचा तपास करीत असताना त्यांना गुन्हेगार अशोकसिंह प्रतापसिंह शिकलीकर रा. सिगनोर ता. गोगावा जि. खरगोण (म.प्र.) याचा घरफोडींमध्ये हात असल्याचे समोर आले होते. अधिक महिती घेतल्यावर सदर आरोपी हा घरफोडी करणारा सराईत असून त्याच्यावर विविध राज्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली. सदर आरोपीचे कोणतेही निश्चित असे राहण्याचे ठिकाण नस्ाून तो मोबाईलचाही वापर करत नाही तसेच तो गुन्हे केल्यावर चारचाकी वाहनाने अमरावतीत शहरातून निघ्ाून जात होता. त्यामुळे त्याला पकडणे पोलिसांसमोर आव्हान होते. ६ मे रोजी गुन्हे शाखेचे पथक खरगोण मध्य प्रदेश येथे गेले. सलग ६ दिवस आरोपींचा अतिशय दुर्गम अश्या भागात शोध घेतला. पोलिसांनी अशोकसिंह प्रतापसिंह शिकलीकर (वय ३३), धिरज केसरवाणी (वय ३५) दोघेही रा. सिगणोर ता. गोगावा जि. खरगोण, मध्य प्रदेश यांना ताब्या घेतले. त्यांना काल अमरावतीत आणण्यात आले. घरफोडी केल्याची कबुली त्यांनी दिली.
हे गुन्हे करताना राहुल प्रधानसिंह शिकलीकर, जागरसिंह दयालसिंह शिकलीकर, राजेन्द्रसिंह जितसिंह शिकलीकर, संदीपसिंह सोनारसिंह शिकलीकर सर्व रा. मध्य प्रदेश सोबत असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी ताब्यातल्या आरोपींकडून १८ लाख ७ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई गुन्हे शाखा पोलिस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात स.पोनि. महेश इंगोले, पोलिस अंमलदार गजानन ढेवले, मनोज ठोसर, आस्तिक देशमुख, मंगेश परिमल, नईम बेग, अतुल संभे, विकास गुडधे, नाजीमोद्दीन, विशाल वाकपांजर, निखील गेडाम, रणजीत गावंडे, योगेश पवार, चेतन गुल्हाने, संदीप खंडारे, सौरभ काळबांडे यांनी केली आहे.