तभा वृत्तसेवा
राळेगाव,
fertilizers-are-expensive : सध्या तालुक्यातील शेतकऱ्यांची खरीप हंगामाची तयारी सुरू असतानाच खत व बियाण्याच्या झालेल्या दरवाढीमुळे शेतकऱ्यांमध्ये मोठी अस्वस्थता पसरली आहे. मात्र कापूस व सोयाबीन ही खरिपातील प्रमुख पिके असलेले पिकाच्या उत्पादन खर्चात झालेले प्रचंड घट शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीवर मोठा ताण आणत आहे.
2024 या वर्षात खरीपात कपाशी बियाण्याचे दर 853 रुपये होते. ते दर 2025 मध्ये 901 रुपयावर गेले आहे. तसेच खताच्या बाबतीत प्रचंड दर वाढ झाली होती. याही वर्षी खरिपात खताच्या किमतीत भरमसाठ वाढ केल्याने शेतकèयांच्या अडचणीत भर पडली आहे.
खताचे वाढलेले दर :
----------------------------------------
खत - मागील वर्षीचे दर - नवीन दर
----------------------------------------
10,26’26’ - 2025 रुपये - 2250 रुपये
20,20,00,13, - 1500 - 1800
12,32,16 - 2025 - 2250
14,35,14 - 2175 - 2400
19,19,19 - 2075 - 2375
एम पी ओ - 1850 - 1975
----------------------------------------
तर डीएपी खताचे दर शासनाने 1350 ते 1359 तसेच युरिया 266 रुपये निश्चित केले असले तरी पुरेसे खत मिळत नसल्याने शेतकèयांना अडचणीला समोर जावे लागते. त्यामुळे शासनाने शेतकèयांना पाहिजे त्या प्रमाणात खत उपलब्ध करून द्यावे अशी मागणी शेतकèयांडून केली जात आहे.
सरकारने खत व बियाण्याचे दर नियंत्रित करावेत. काळाबाजार लिंकिंग सारख्या प्रकारावर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे. तसेच शेतकèयांना पाहिजे ती खते बियाणे वेळेत उपलब्ध करून द्यावेत यासाठी कृषी विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.