खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी नियोजनबद्ध तयारी करावी

    दिनांक :13-May-2026
Total Views |
उमरखेड,
kharif-season : आगामी 2026 खरीप हंगामाच्या पृष्ठभूमिवर शेतकèयांनी पेरणीपूर्व नियोजन, अधिकृत बियाणे व खतांची निवड तसेच हवामानाचा योग्य अंदाज घेऊन शेतीची तयारी करावी, असे आवाहन भाऊसाहेब माने कृषी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोक वानखेडे यांनी केले आहे. मागील वर्षीच्या अतिवृष्टीमुळे शेतकèयांचे मोठे नुकसान झाले असून कर्ज, पीक विमा व आर्थिक अडचणींचा सामना करत यंदाचा खरीप हंगाम सुरू होत आहे. त्यामुळे शेतकèयांनी घाईने पेरणी न करता किमान 60 ते 70 मिमी पाऊस झाल्यानंतरच अधिकृत कृषी सल्ल्यानुसार पेरणी करावी, असे त्यांनी सांगितले.
 
 
jk
 
 
 
बोगस बियाणे व खतांपासून सावध राहून केवळ परवानाधारक कृषी केंद्रातूनच खरेदी करावी. बियाण्याची उगवण क्षमता, तारीख व प्लॉट नंबर तपासून पिशव्या जपून ठेवाव्यात. तसेच बीज प्रक्रिया, सेंद्रिय खतांचा वापर, आंतरपीक पद्धती आणि कमी पाण्यावर येणाèया पिकांना प्राधान्य देण्याचा सल्लाही त्यांनी दिला.