राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा बदल! पार्थ पवार यांच्याकडे मोठी जवाबदारी

जय पवार यांचा कार्यकारी समितीत समावेश

    दिनांक :13-May-2026
Total Views |
मुंबई, 
parth pawar महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक रचनेत मोठे बदल करण्यात आले आहेत. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारी समितीत पार्थ पवार आणि जय पवार यांना महत्त्वाची जबाबदारी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
 
parth pawar
 
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी भारतीय निवडणूक आयोगाला (ECI) पाठवलेल्या पत्राद्वारे पक्षाच्या २२ सदस्यांच्या राष्ट्रीय कार्यकारी समितीची यादी सादर केली आहे. या यादीत पार्थ पवार यांची सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्यावर पक्ष समन्वयाची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
तर जय पवार यांची राष्ट्रीय सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्याकडे पक्षाच्या शिस्तपालन समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही देण्यात आली आहे. या निर्णयामुळे पक्ष संघटनेत नव्या पिढीला महत्त्वाचे स्थान मिळाल्याचे स्पष्ट दिसत आहे.
कार्यकारी समितीत ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे.parth pawar याशिवाय सुबोध मोहिते, माणिकराव कोकाटे यांसारख्या नेत्यांनाही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.
या समितीत विविध राज्यांतील आणि घटक राज्यांतील नेत्यांचा समावेश करून पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. युवा नेतृत्वाला संधी देत पक्षाने आगामी राजकीय रणनीतीकडे लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येत आहे.