पुदुचेरी,
n rangasamy ऑल इंडिया एनआर काँग्रेस (एआयएनआरसी) प्रमुख एन. रंगस्वामी आज, १३ मे रोजी पुदुचेरी केंद्रशासित प्रदेशाचे मुख्यमंत्री म्हणून पाचव्यांदा शपथ घेणार आहेत. राजभवनात होणाऱ्या या शपथविधी सोहळ्यात सकाळी ९:४७ वाजता नायब राज्यपाल के. कैलासनथन त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील.
मिळालेल्या माहितीनुसार, पुदुचेरी विधानसभा निवडणुकीत एआयएनआरसीने १६ पैकी १२ जागांवर विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले, तर मित्रपक्ष भाजपने १० जागांपैकी ४ जागा जिंकल्या. एआयएडीएमके आणि इतर घटक पक्षांनीही प्रत्येकी एक जागा मिळवत एनडीए आघाडीला ३० सदस्यीय विधानसभेत १८ जागांचे स्पष्ट बहुमत मिळवून दिले आहे. यामुळे पुन्हा एकदा पुदुचेरीत एनडीए आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे.
एन. रंगस्वामी यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात काँग्रेस पक्षातून झाली होती. २००१ ते २००६ आणि २००६ ते २००८ या कालावधीत त्यांनी मुख्यमंत्रीपद भूषवले होते.n rangasamy त्यानंतर २०११ मध्ये त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत ऑल इंडिया एनआर काँग्रेस या स्वतःच्या पक्षाची स्थापना केली आणि त्याच वर्षी झालेल्या निवडणुकीत मोठा विजय मिळवत ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. पुढील कार्यकाळात त्यांनी विकासकामे आणि आघाडी राजकारणावर भर दिला.
२०२६ च्या निवडणुकीतील यशानंतर रंगस्वामी पुन्हा एकदा सत्तेत परतले असून, त्यांचा हा पाचवा मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ ठरणार आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पुदुचेरीत राजकीय स्थैर्य आणि विकासाची दिशा कायम राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.