ध्वनी प्रदूषण जनजागृती दिवस रॅलीचे आयोजन

    दिनांक :13-May-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
पुसद,
noise-pollution-awareness-day-rally : आंतरराष्ट्रीय ध्वनी प्रदूषण जनजागृती दिवसानिमित्त प्रदूषण जनजागृतीचे आयोजन रोटरी क्लबचे अध्यक्ष श्रीराम पद्मावार यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले होते. या रॅलीत पुसदमधील विविध संघटनांनी सहभाग नोंदवला. एनआयएस समिती आयएमए महाराष्ट्र राज्य संघटना, नाक, कान, घसा विदर्भ संघटना, इंडियन मेडिकल असोसिएशन शाखा पुसद, पतंजली योग समिती, महिला पतंजली योग समिती, गुरुदेव सेवा मंडळ, पुसद पत्रकार संघ या सामाजिक संघटनांनी या रॅलीमध्ये सहभाग नोंदवून आज समाजामध्ये विविध मार्गाने ध्वनी प्रदूषण होत आहे. त्याबद्दल स्लोगन लोकांपर्यंत पोचवले. समाजात ध्वनी प्रदूषण कमी कसे होईल व सामाजिक समस्या कशा दूर करता येईल, याबद्दल विविध घोषवाक्य यामधून देण्यात आले. डॉ. विश्वास डांगे यांनी त्यावर उपाय सांगितले. यानंतर वसंतराव नाईक चौकामधून रॅलीचे प्रस्थान झाले.
 
 
 
kjk
 
 
 
शिवाजी चौक सुभाष चौक, मुखरे चौक आणि रॅली ही समाप्ती तहसील कार्यालयाजवळ करण्यात आली. यात इंडियन मेडिकल असोसिएशन शाखा पुसदचे अध्यक्ष डॉ. संजय अग्रवाल, सचिव डॉ. ललित जाधव वचमू तसेच स्त्रीरोग संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रणिता रेवनवार, सचिव डॉ. मीरा डांगे, पतंजली महिलाचे प्रमुख माधुरी वानरे, पतंजली योग समिती प्रमुख प्रकाश वानरे, सुरेश गोविंदवार, गुरुदेव सेवा मंडळचे प्रकाश लामणे, रोटरी क्लब सदस्य विजय ठाकरे, अश्विन आडे. डॉ. अमोल खांदवे, डॉ. उमेश रेवनवार उपस्थित होते.