अमरावती,
rajeshwari-rathod : सीबीएसई इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. पी. आर. पोटे पाटील कनिष्ठ महाविद्यालयाची राजेश्वरी रवींद्र राठोड हिने ९६.४० टक्के गुण घेऊन जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान पटकविला आहे. पोटे महाविद्यालयाने सातत्यपूर्ण गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे. यंदाच्या परीक्षेसाठी विद्यालयातून एकूण ८० विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. सर्व विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती दिली.

महाविद्यालयाची या निकालात तब्बल २७ विद्यार्थ्यांनी ८० ते ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवत गुणवंत यादीत स्थान पटकावले. राजेश्वरी रवींद्र राठोड हिने ९६.४० टक्के गुण मिळवत महाविद्यालयातून व जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावला. पार्थ सुमीत चांडक याने ९५.०० टक्के, अथर्व विजय वानखडे व नवीषा संदीप दानखडे यांनी प्रत्येकी ९३.२० टक्के गुण मिळवले. प्रसाद मुरलीधर वाडेकर ९२.८० टक्के, मल्हार जीवन डालके ९२.४० टक्के, हिमांशू संजय महल्ले ९१ टक्के, यश नितीन दातीर ९०.४० टक्के आणि मयंक शैलेश हटवार ९०.२० टक्के गुणांसह यशस्वी ठरले. याशिवाय अनुष्का किशोर पखाण ८९.४० %, सर्वज्ञ नितीन कडू ८९.२० %, हेमांगी नरेंद्र भुजाडे ८८.२० %, आर्यन ज्ञानेश्वर वावरकर ८८.०० %, अधिराज हेमंतकुमार डिके ८७.८० %, आयुषी आशिष देशमुख ८७.६० %, ओजस्वी मंगेश राऊल ८६.६० %, अग्रजा महेश साबळे ८६.२० %, गौतमी प्रतापराव अडसड व पृथ्वी निलेश ठाकरे प्रत्येकी ८५.०० %, आशी मनीष अग्रवाल ८४.८० %, साहिल गणेशराव बोकडे ८४.६० %, आर्यमन विजय लेवटे व हर्ष राजेंद्र वारकरी प्रत्येकी ८२.८० %, कृपा रवींद्र घुगे व वेदांत प्रवीण वानखडे प्रत्येकी ८२.६० %, पृथा गजानन धर्माळे ८२.४० % आणि मोहम्मद अबुजर ८०.२० % गुण मिळवत गुणवंत ठरले. विद्यार्थ्यांच्या या यशामागे त्यांची जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास, पालकांचे सहकार्य तसेच शिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांचेही कौतुक करण्यात आले.
राजेश्वरीला व्हायचे डॉक्टर
सीबीएसई बारावीच्या परीक्षेत ९६.४० टक्के गुण घेऊन जिल्ह्यात प्रथम आलेल्या राजेश्वरी राठोड हीच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तिला डॉक्टर व्हायचे आहे. तिचे वडील रवींद्र राठोड वीज वितरण कंपनीत अभियंता आहे. आईने सुद्धा अभियांत्रिकीची पदवी घेतली असून त्या गृहीणी आहे. तिचा भाऊ दहाव्या वर्गात होता. राजेश्वरीला संगीताची आवड आहे. तिने ज्युनीअर स्किल स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधित्व केले आहे. शिकवणी वर्गातील व शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनात तिने परीक्षेची तयारी केली. पेपर सोडविण्याचा सराव केल्याने आपल्या फायदा झाला. नीट परीक्षेची तयारी सुरू असल्याचे तिने सांगितले.