मारेगाव,
rising-fertilizer : गेल्या पाच-सहा वर्षांपासून निसर्गाच्या अनियमित लहरीपणाशी झुंज देत जगणारा बळीराजा आज अक्षरशः आर्थिक विवंचनेच्या दरीत उभा आहे. कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी, तर कधी अवकाळी पावसाच्या तडाख्याने शेतकऱ्यांच्या हातची पिके वारंवार हिरावली गेली. काळ्या मातीत घामाचे मोती पेरणाऱ्या शेतकऱ्यांच्या पदरी मात्र सतत नुकसान, कर्ज आणि नैराश्यच येत राहिले. त्यातच आता खरीप हंगामाच्या उंबरठ्यावर रासायनिक खतांच्या किंमतीत झालेल्या मोठ्या वाढीने बळीराजाच्या जखमेवर जणू मीठ चोळले आहे.
लागू झालेल्या नव्या दरानुसार एनपीके खताच्या एका गोणीमागे तब्बल 200 ते 300 रुपयांची वाढ झाली आहे. आधीच आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतकèयांसाठी ही दरवाढ म्हणजे मोठा धक्का ठरत आहे. गेल्या काही वर्षांत सततच्या नापिकीमुळे अनेक शेतकèयांची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटली आहे. शेतीसाठी घेतलेले कर्ज फेडायचे कसे, मुलाबाळांचा संसार चालवायचा कसा आणि पुढील पेरणीसाठी पैसा आणायचा कुठून, या प्रश्नांनी ग्रामीण भागातील शेतकरी अक्षरशः हैराण झाला आहे.
खरीप हंगाम म्हणजे ग्रामीण अर्थचक्राचा मुख्य आधार. याच काळात शेतकरी बी-बियाणे, खते, औजारे, मजुरी व शेतीसाठी लागणाèया इतर साहित्याची जुळवाजुळव करत असतो. मात्र उत्पादन खर्च दिवसेंदिवस वाढत असताना पिकांना अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्याने शेती आता परवडेनाशी होत चालली आहे. पिके येतात तेव्हा भाव नसतो आणि भाव असतो तेव्हा पिके हातची जातात, अशी विदारक परिस्थिती शेतकरी अनुभवत आहे.
निसर्गाचाही लहरीपणा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. वेळेवर पाऊस नाही. आला तर अतिवृष्टी, कधी गारपीट तर कधी दीर्घ खंड, या सगळ्या संकटांनी बळीराजाचे कंबरडे मोडले आहे. मागील काही वर्षांत अनेकदा पिके डोळ्यांसमोर उद्ध्वस्त होताना पाहिलेल्या शेतकèयांच्या मनातील उमेद आता हळूहळू मावळताना दिसत आहे.
त्यातच यंदा खतांच्या दरात तिसèयांदा वाढ झाल्याने शेतकरी वर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे. काही ठिकाणी ‘लिंकिंग’ पद्धतीने खत विक्री होत असल्याच्या तक्रारींमुळे अडचणी अधिकच वाढल्या आहेत. गरज नसतानाही अतिरिक्त खते किंवा साहित्य खरेदी करण्याची सक्ती होत असल्याने शेतकèयांवर आर्थिक भार पडत आहे.