पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, ड्रोन व कृषी यंत्राचे वाटप

कृषी यंत्र खरेदीसाठी 2228 शेतकऱ्यांना 12 कोटी वितरित

    दिनांक :13-May-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
sanjay-rathod : राष्ट्रीय कृषी विकास यांत्रिकीकरण योजना आणि राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत 10 शेतकऱ्यांना पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते कृषी औजार व यंत्राचे वाटप करण्यात आले.
 
 
 
y13May-Watap
 
 
 
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात खरीप हंगामपूर्व बैठकीपूर्वी या कृषी अवजारे व यंत्रांचे वाटप गुरुवार, 7 मे रोजी करण्यात आले. यावेळी खा. प्रतीभा धानोरकर, आ. बाळासाहेब मांगुळकर, आ. राजू तोडसाम, आ. किसन वानखेडे, आ. संजय देरकर, जिल्हाधिकारी विकास मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे व शेतकरी उपस्थित होते.
 
 
कृषी विभागाच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत रामेश्वर रामराव तायडे (मनपूर ता. यवतमाळ) यांना नांगर व ट्रॅक्टर खरेदीसाठी 1 लाख 72 हजार 500 रुपये, संदीप देवराव जावके (बेलोरा ता. यवतमाळ) यांना ट्रेलरसाठी 80 हजार रुपये, विलास शिवराम पारधी (किन्हाळा ता. कळंब) यांना बहू पीक मळणी संत्र्यासाठी 2 लाख 25 हजार रुपये, प्रदीप उत्तम मून (सावरगाव, ता. कळंब) यांना ट्रॅक्टरसाठी 1 लाख 25 हजार रुपये, दत्ता देवबा (मारनर, खातखेडा ता. कळंब) यांना यांना ट्रॅक्टरसाठी 1 लाख 25 हजार रुपये, शिवकुमार गोकुळदास पांडे, चिली (ई), ता. महागाव यांना ड्रोनसाठी 4 लाख रुपये, सीमा गजानन चिव्हाणे (वाèहा, ता. राळेगाव) यांना जेसीबीसाठी 3 लाख 57 हजार रुपये, अंकुश पुंडलिक राठोड (दहेली, ता. पांढरकवडा) यांना जेसीबीसाठी 2 लाख 86 हजार रुपये, किशोर रामराव झाटे (अंतरगाव ता. बाभुळगाव) यांना बहू पीकमळणी यंत्रासाठी 2 लाख 25 हजार रुपये आणि किशोर किसन शिरभाते (राणीअमरावती ता. बाभुळगाव) यांना ट्रॅक्टरसाठी 1 लाख रुपयांचे अनुदान देण्यात आल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाèयांनी यावेळी दिली.
कृषी यंत्र खरेदीसाठी 2228 शेतकèयांना 12 कोटी वितरित
 
 
राष्ट्रीय कृषी विकास यांत्रिकीकरण योजना आणि राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत 2025-26 या आर्थिक वर्षात कृषी यंत्र खरेदीसाठी जिल्ह्यातील 2228 शेतकèयांना तब्बल 12 कोटी 58 लाख 44 हजार रुपये अनुदान रक्कम वितरित करण्यात आली आहे. यामध्ये ट्रॅक्टर, रोटावेटर, पावर टिलर, पावर विडर, थ्रेशर, हार्वेस्टर, ट्रेलर, सीड ड्रिल, कल्टवेटर, डोझर, बॉयलर, कॉटन ष्रेडर इ. कृषी यंत्रांसाठी शेतकèयांना अनुदान वितरित करण्याचे आले आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.