अमरावती,
sheikh-hatim : सीबीएसई इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी, अमरावतीद्वारा संचालित टायटन्स पब्लिक स्कूल शाळेचा विद्यार्थी शेख हातीम शेख इब्राहिम याने ९७.४० टक्के गुण मिळवून अमरावती जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे.
टायटन स्कूलचा निकाल ९० टक्के लागला आहे. शाळेच्या अन्य गुणवंत विद्यार्थांमध्ये अनन्या मत्तील ९३.६० %, न्यासा काळे ९३.४० %, संमयी सावरकर ९२.२० %, तनिशा चांडक ९२ %, निलय सोनुकले ९०.२० %, याशिका धोटे ९० %, प्रसन्ना मह‘े ८९.८० %, मोहित काळमेघ ८८ %, जिया जैस्वाल ८७.८० %, रुद्रा चोरे ८७.६० %, अथर्व लिखितकर ८७.२० %, अथर्व गावंडे ८७.२० %, स्वरांगी सावरकर ८६.६० %, आर्यन अजमिरे ८६.२० %, आशी जैन ८६.२० %, मंदार जावरे ८५ % यांचा समावेश आहे. यावर्षी २० विद्यार्थ्यांनी ८५ पेक्षा जास्त गुण मिळवत क‘मांक पटकावला आहे. प्रथम येणार्या व गुणवत्ता क‘मांक मिळविणार्या विद्यार्थांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. नितीन धांडे, उपाध्यक्ष अॅड. उदय देशमुख, कोषाध्यक्ष डॉ. हेमंत देशमुख, सचिव युवराजसिंग चौधरी, कार्यकारी संचालक नितीन हिवसे, डॉ. पूनम चौधरी, पंकज देशमुख, प्रो. विनय गोहाड, प्रो. गजानन काळे यांच्यासह शाळेचे प्राचार्य अजय चौबे, शक्षिक व शक्षिकेत्तर कर्मचार्यांनी अभिनंदन केले.शाळेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांचे, शक्षिकांचे व पालकांचे अभिनंदन करण्यात आले आहे. उत्कृष्ट निकालांची परंपरा टायटन्स पब्लिक स्कूलने कायम ठेवली असून उत्साहाचे वातावरण आहे.