श्री पिंगलाक्षी देवी संस्थांच्या अध्यक्षपदी गणेश बगडिया

    दिनांक :13-May-2026
Total Views |

Shri Pingalakshi Devi Sanstha
 
 
रिसोड, 
Shri Pingalakshi Devi Sanstha रिसोडची ग्रामदेवता श्री पिंगलक्षी देवी संस्थान ची नवीन कार्यकारीणी जाहीर झाली असून अध्यक्षपदी गणेश नंदकिशोर बगडिया यांची अविरोध निवड करण्यात आली. कार्यकारणीमध्ये उपाध्यक्ष गजानन प्रकाश पांडे, सचीव संतोष पुरुषोत्तम वाघमारे, कोषाध्यक्ष अजय राधेश्याम बगडिया, सदस्य पदी मनीष कमलकिशोर बगडिया, शिवम अजय बगडिया, सचिन सुभाषचंद्र बबेरवाल यांची नियुक्ती करण्यात आली. रिसोड शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या निसर्गरम्य तलावाच्या काठावरील पिंगलाक्षी देवीचे पुरातन मंदिर आहे. स्वातंत्र्योत्तर काळात नागपूर विभागाचा समावेश मध्यप्रदेशात होता तेव्हाच्या सीपी अँड बेरार व अकोला जिल्ह्यात आणि नवनिर्मित वाशीम जिल्हा झाल्यानंतर वाशीम जिल्ह्यामध्ये या संस्थांन चे नियमित रजिस्ट्रेशनचे नूतनीकरण होत आले आहे. अतिशय जुन्या या संस्थांन च्या मंदिराचा नुकताच जीर्णोद्धार झाला असून येथे विकासाची कामे सुरू आहेत. गणेश बगडिया यांच्या अध्यक्ष कार्यकाळात संस्थांन चा अधिक विकास होईल अशी भाविक भक्तांना अपेक्षा आहे.