तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
shubhalakshmi-kulkarni : शुभलक्ष्मी कुळकर्णी यांना हिंदुस्तानी शास्त्रीय गायन प्रकारात ऑल इंडिया रेडिओतर्फे ‘बी हाय आकाशवाणी कलाकार’ ही श्रेणी प्राप्त झाली आहे. प्रसारभारती तर्फे मागील वर्षी घेण्यात आलेल्या ऑडिशनमध्ये त्यांना हे यश मिळाले आहे. मूळ यवतमाळ येथील असलेल्या शुभलक्ष्मी सध्या अमरावतीच्या डॉ. राजेंद्र गोडे मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएस करत आहे. आपल्या यशाचे शेय शुभलक्ष्मी तिचे गुरू स्व. विजय दुरतकर, श्यामकांत बर्वे तसेच वडील प्रसाद व आई पौर्णिमा कुळकर्णी व सर्व कुटुंबियांना देते.
शास्त्रीय संगीतात विशारद असलेल्या शुभलक्ष्मी यांचे शास्त्रीय, उपशास्त्रीय, भक्तीसंगीत, सुगम संगीत, गझल इत्यादी कार्यक्रम विदर्भात विविध ठिकाणी झाले आहेत. तसेच विदर्भस्तर, राज्यस्तर विविध स्पर्धांमधे त्यांनी यश मिळवले आहे. नादब्रह्म सावंतवाडीतर्फे घेण्यात आलेल्या नाट्यगीत स्पर्धेत महाराष्ट्र-गोवा-कर्नाटक या तिन्ही राज्यांतून शुभलक्ष्मी यांनी खुल्या गटात द्वितीय क्रमांक प्राप्त केला होता, हे विशेष.