कारंजा लाड,
SIR review meeting कारंजा शहरात भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित विशेष गहन पुनरीक्षण आढावा बैठक पार पडली. या बैठकीला खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधिर सावरकर, आमदार सई डहाके, आमदार श्याम खोडे, भाजप जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम चितलांगे यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत विधानसभा क्षेत्रात विशेष गहन पुनरीक्षण प्रभावीपणे राबविण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. बूथस्तरापर्यंत संघटन मजबूत करून प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.यानंतर पार पडलेल्या भव्य भाजपा पक्षप्रवेश सोहळ्याने कार्यक्रमात विशेष रंगत आणली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार सई डहाके यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत विविध पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.
विशेष म्हणजे, माजी जिल्हा परिषद सदस्य उमेश ठाकरे यांनी शेकडो युवकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच राष्ट्रीय युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आणि त्यांच्या समर्थकांनीही भाजपची विचारधारा स्वीकारत पक्षात प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. पक्षप्रवेश करणार्या सर्व कार्यकर्त्यांचे मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. यावेळी माजी खासदार अनंतराव देशमुख, विजय जाधव, जिल्हा सरचिटणीस डॉ. राजीव काळे, भक्तराज महाराज, कौस्तुभ डहाके, भाजपा शहराध्यक्ष अमित संगेवार, तालुका अध्यक्ष अमोल ठाकरे, नगरपरिषद गटनेत्या शालिनी ठाकरे यांच्यासह भाजपा नगरसेवक, पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रमामुळे कारंजा मानोरा विधान सभा मध्ये भाजप संघटन अधिक बळकट झाल्याचे चित्र दिसून आले.