SRPF जवानाचा २२ वर्षीय तरुणीवर वर्षभर लैंगिक अत्याचार!

    दिनांक :13-May-2026
Total Views |
लोणार,
srpf-jawan : नोकरी लागेपर्यंत प्रेम उफाळून आलेल्या प्रियकराने ‘एसआरपीएफ’मध्ये (राज्य राखीव पोलीस बल) भरती होताच रंग बदलले. तोपर्यंत लग्नाचे आमिष दाखवून अनेकवेळा तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. तो बदलल्याने प्रेयसीने सिडको पोलीस ठाण्यात धाव घेऊन त्याच्याविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी सोमवारी (११ मे) नागपूर SRPF मध्ये अंमलदार असलेल्या नितेश राम चव्हाण (रा. तांबोळा, ता. लोणार, जि. बुलडाणा) याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
 
 
 
JLK
 
 
 
वारंवार बलात्कार केल्याचा प्रकार १८ ऑक्टोबर २०२४ ते २२ डिसेंबर २०२५ दरम्यान घडला. २२ वर्षीय तरुणीने याप्रकरणात तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, ती जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील आहे. २०२३ मध्ये ती पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर शहरात आली होती. तेव्हा नितेश हाही पोलीस भरतीची तयारी करत होता. ती हडको एन १२ स्वामी विवेकानंदनगर भागात रूम करून राहत होती, तर नितेश हाही सुदर्शननगर, टीव्ही सेंटर भागात रूम करून राहत होता. या दरम्यान त्यांची ओळख होऊन मैत्री झाली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.
 
 
ती अधूनमधून त्याच्या खोलीवर डबा घेऊन जायची. १८ ऑक्टोबर २०२४ रोजी ती डबा घेऊन आली असता नितेशने तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. तिने विरोध केला असता त्याने लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर त्याने अनेकदा टीव्ही सेंटरवरील रूमवर, रोझ गार्डनसमोरील लॉजवर, तरुणीच्या खोलीवरही शारीरिक संबंध ठेवले. संबंध ठेवत असताना त्याने तिचे गुपचूप फोटो काढले होते. २०२४ मध्ये नितेश राज्य राखीव पोलीस बल, नागपूर येथे भरती झाला. त्यानंतर लग्नाला नकार देत त्याने दोघांचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. फसवणूक झाल्याची जाणीव झाल्याने तरुणीने सिडको पोलिसांत धाव घेऊन तक्रार दिली. अधिक तपास फौजदार निवृत्ती गायके करीत आहेत.