stole jewelry प्रेयसीला नवीन ड्रेस, नेकलेस, पार्टी आणि तिला गाेव्याला िफरायला न्यायचे असल्यामुळे युवकाने चक्क सराा दुकानात चाेरी करण्याची याेजना आखली. तीन मित्रांना या याेजनेत सहभागी करुन घेत एमआयडीसी हद्दीतीले एका सराा दुकानातून 42 लाखांचे दागिने लंपास केले. या चाेरीचा पाेलिसांनी छडा लावला आहे. अटक करण्यात आलेल्या आराेपींमध्ये मुस्ता इस्राएल खान (18, आनंदनगर, रामगढ, कामठी), डब्ल्यूसीएल काॅलनी येथील सुमित महावीर सुमन (18), सागर उफर् लिंगा वाघाडे (19, वाडी) आणि त्यांचा अल्पवयीन साथीदार यांचा समावेश आहे.
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी, आयसी चाैक येथे मनाेज शाह यांचे माेनाली ज्वेलर्स आणि माेनाली स्टील ही दुकाने आहेत. शाह दुकानाच्या वरच्या मजल्यावर राहतात. 8 मे राेजी पहाटेच्या सुमारास मुस्ता आणि त्याच्या साथिदारांनी माेनाली स्टीलमध्ये प्रवेश केला. तेथून माेनाली ज्वेलर्सकडे जाणारा एक आतला दरवाजा हाेता. ते त्या दारातून माेनाली ज्वेलर्समध्ये शिरले. त्यांनी लाॅकरमधून राेकड आणि दागिने चाेरले आणि पसार झाले. दागिन्यांची विभागणी केल्यानंतर, मुस्ता आणि अल्पवयीन मुलगा अमरावतीमधील बडनेरा येथे गेले.stole jewelry तर सुमित आणि सागर भाेपाळला गेले. त्यांच्या मैत्रिणी त्यांच्यासाेबत हाेत्या. सुमित उज्जैनला गेला. पाेलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे बडनेरा येथे मुस्ता आणि अल्पवयीन मुलाला पकडले. उज्जैनला तिथे छापा टाकून सुमितला ताब्यात घेण्यात आले. तिघांकडून 310 ग्रॅम साेने, 1700 ग्रॅम चांदीचे दागिने, एक बाईक आणि एक माेबाईल ाेनसह 28.51 लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला.